महाड (वार्ताहर) : महाड तालुक्यातील कोळोसे येथे राहणाऱ्या बौद्ध समाजातील वृद्ध इसमाची त्याच्या अज्ञानाचा फायदा घेत फसवणूक करुन त्याची जमीन हडपल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ५ जणांविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड तालुक्यातील कोळोसे येथे राहणाऱ्या नथुराम जाधव यांची सुमारे ३४ गुंठे जमीन आहे. दरम्यान गावातील राजेंद्र मोर्या यांनी नथुराम जाधव यांच्या अज्ञानाचा फायदा घेत सदर जमीन आपल्या नावावर करून घेतली. तसेच आरोपीकडून जाधव यांना वेळोवेळी जातीवाचक व अश्लील शिवीगाळ करण्यात आली.
याप्रकरणी तक्रार केल्यावर राजेंद्र मोर्या, गुलाब मोर्या, रवी मोर्या, निलम मोर्या सर्व रा. कोळोसे, भूषण देवळेकर रा. नाते या ५ आरोपी विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे.