तलासरी (वार्ताहर) : मुंबई -अहमदाबाद महामार्गांवरील तलासरी जवळ आमगाव येथे सोमवारी संध्याकाळी मुंबईहून गुजरातकडे भरधाव जाणारी क्रेटा कारने डिव्हायडर ओलांडून समोरून येणाऱ्या टेम्पोला धडक दिल्याने अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जन गंभीर जखमी झाले. या घटनेला बारा तास होत नाही तोच तेथेच दुसरा अपघात होऊन यात दोघांचा मृत्यू होवून एक गंभीर जखमी झाला. याबाबत तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामार्गावर मृत्यूचे तांडव सुरु असताना, महामार्ग प्राधिकरण मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याची टीक करण्यात येत आहे.
मुंबईहून गुजरातकडे भरधाव जाणाऱ्या क्रेटा कारच्या (क्रमांक ९८२८) चालकाचे आमगाव येथे ताबा सुटल्याने डिव्हायडरला धडकून मुंबईकडे येणाऱ्या आयशर टेम्पो वर (९०३७) आदळली. यामध्ये कार चालक कुलदीप मौर्या (वय ३२) राहणार सुरत, वीरेनकुमार उमाप्रसाद मिश्रा (वय ३४), तसेच टेम्पो चालक श्रीकृष्ण राजकुमार मिश्रा राहणार बस्ती उत्तरप्रदेश या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर राजेशकुमार चंदुभाई देसाई, अजय चंदुभाई देसाई दोघेही राहणार मोठा वरच्छा सूरत हे गंभीर जखमी झाले.
सदर घटना होऊन बारा तास पण पूर्ण होत नाही, तोच त्याच ठिकाणी मंगळवारी दुपारी आर्टिका कार क्रमांक २६६१ आणि टेम्पो क्रमांक ९४७० यांचा भीषण अपघात होऊन यात कारमधील ध्वनीत विनोदचंद्र पटेल व राठोड अशा दोन जणांचा मृत्यू झाला. तर टेम्पो चालक भुवनेश्वर महेंद्र जाधव हा गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सदर ठिकाणी अपघातात मोठ्या प्रमाणात नागरिकांचे जीव जात असताना, महामार्ग प्राधिकरणाला जाग कधी येणार असा सवाल केला जात आहे.
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…
डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…
CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…