मुंबई : मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी भाजप नेते, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या उपसमितीमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, शंभुराज देसाई आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश करण्यात आला आहे.
यापुढे मराठा आरक्षणाबद्दल बैठका होतील किंवा शिष्टमंडळे येतील आणि जे काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील ते ही समिती घेईल आणि यावर शिक्कामोर्तब करण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील.
मराठा आरक्षणाबद्दलचा तिढा, मराठा समाजाच्या सोई-सुविधा किंवा आर्थिक बाबी आहेत, त्या सोडवण्यासाठी या समितीची निर्मिती करण्यात आली आहे.
#मराठाआरक्षण बाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री @ChDadaPatil यांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यास मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी मान्यता दिली आहे. #Reservation pic.twitter.com/nUs2pDC7CS
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 20, 2022