Sunday, August 31, 2025

झेलबाद झाल्यानंतर नवीन फलंदाज स्ट्राईकवर; आयसीसीच्या नियमांत मोठे बदल

झेलबाद झाल्यानंतर नवीन फलंदाज स्ट्राईकवर; आयसीसीच्या नियमांत मोठे बदल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीसीने क्रिकेटच्या काही नियमांत बदल केले आहेत. त्यानुसार जेव्हा एखादा फलंदाज झेलबाद झाल्यानंतर नवीन फलंदाज स्ट्राईकवर खेळायला येईल. तसेच चेंडूवर थुंकी लावण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. यासह विविध नियमांत बदल करण्यात आला आहे. आयसीसीचे नवे नियम १ ऑक्टोबर २०२२ पासून लागू होतील.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखाली पुरुष क्रिकेट समितीने, मेरीलेबोन क्रिकेट क्लबने महिला क्रिकेट समितीशी केलेल्या नियमांवर चर्चा केली होती. त्यानंतर नियमांत बदल करण्यात आला आहे. आयसीसीचे नवे नियम १ ऑक्टोबर २०२२ पासून लागू होतील. म्हणजेच पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणारा आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक या नवीन नियमांच्या आधारे खेळवला जाईल.

आयसीसीच्या नवीन नियमानुसार, जेव्हा एखादा फलंदाज झेलबाद झाल्यानंतर नवीन फलंदाज स्ट्राईकवर खेळायला येईल. बाद झालेल्या फलंदाजाच्या क्रीज बदलण्याने किंवा न बदलण्याचा काहीच फरक पडणार नाही. यापूर्वी फलंदाज झेल बाद होण्यापूर्वी स्ट्राईक चेंज झाल्यानंतर नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकवर यायचा. चेंडूवर थुंकी लावण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या चेडूंवर थुंकी लावण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता हा नियम पुढे कायम ठेवण्यात आला आहे.

कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजाला दोन मिनिटांच्या आत स्ट्राइक घ्यावा लागेल. तर, टी-२० मध्ये त्याची वेळ मर्यादा ९० सेकंद आहे. यापूर्वी एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानात येणाऱ्या दुसऱ्या फलंदाजाला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन मिनिटे मिळायची. फलंदाज दोन मिनिटांच्या आत स्ट्राईक घेऊ न शकल्यास विरोधी संघाचा कर्णधार टाईम आऊटची मागणी करण्यास पात्र असेल.

चेंडू खेळपट्टीबाहेर पडल्यास त्याला डेड म्हणून घोषित केला जाईल. तसेच फलंदाजाला खेळपट्टी सोडण्यास भाग पाडणारा कोणताही चेंडू नो-बॉल ठरवला जाईल. गोलंदाजाच्या गोलंदाजी (रनअप) दरम्यान क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या खेळाडूंकडून काही अयोग्य वर्तन किंवा जाणूनबुजून चुकीची हालचाल करण्यात आली. तर, पंच या चेंडूला डेड बॉल ठरवतील. तसेच फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यात ५ धावा जमा होतील. जर गोलंदाजाने गोलंदाजी करण्यापूर्वी नॉन-स्ट्रायकर क्रीझमधून बाहेर पडला आणि गोलंदाजाने फलंदाजाला रनआऊट केल्यास त्याला बाद घोषित केले जाईल. यापू्र्वी असे केल्यास अनफेयर प्ले मानले जायचे. टी-२० प्रमाणेच आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही षटक वेळेवर पूर्ण न झाल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ३० यार्डच्या आत अतिरिक्त एक फिल्डर ठेवावा लागेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा