Thursday, July 10, 2025

धक्कादायक; नाशिकमध्ये आठ महिन्याच्या बाळाने चक्क नेलकटर गिळले

धक्कादायक; नाशिकमध्ये आठ महिन्याच्या बाळाने चक्क नेलकटर गिळले

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरातील नाशिकरोड परिसरात आठ महिन्याच्या बाळाने चक्क नेलकटर गिळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिक रोड परिसरात के. जी. मेहता येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली.


या प्रकरणात जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार शक्य नसल्याने मेडिकल कॉलेजमध्ये बाळावर उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी नेलकटर बाहेर काढण्यात आल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आशिष शिंदे असे या बाळाचे नाव आहे.


नाशिकमध्ये आठ महिन्यांच्या बाळाने हे नेलकटर गिळले. हा मुलगा घरामध्ये खेळत असतानाच त्याच्या हातामध्ये नेलकटर आल्यानंतर ते खेळत असताना त्याने ते गिळले. यावेळी बाळाला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे आईने बघितले. बाळाच्या आईने तात्काळ नाशिकच्या आडगाव परिसरातील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आणि त्यानंतर या बाळावर शस्त्रक्रिया करून हे नेलकटर बाहेर काढण्यात आले आणि बाळाची प्रकृती ही व्यवस्थित आहे समोर आले. मुलाची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Comments
Add Comment