 |
अडचणींवर मात कराल
मेष – तुम्ही जे काम हाती घ्याल, त्यात यशस्वी होणार आहात. आपल्या प्रयत्नांना चांगले यश मिळणार आहे. आपण सर्व अडचणींवर मात करणार आहात. आपला आत्मविश्वास चांगला असणार आहे. नोकरीमध्ये आपली परिस्थिती चांगली असणार आहे. आगीपासून सावध राहणे. डोळ्यांवरील इजा होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. उष्णतेचे त्रास होण्याची शक्यता. नवीन ओळखी होण्याची शक्यता, त्यातून आपणाला लाभ होणार आहे. आपला सामाजिक दर्जा वाढेल. कुटुंबातील व्यक्तींकडून आपणाला सहकार्य मिळेल.
|
 |
स्थावर प्रश्न सुटतील
वृषभ – कुटुंबातील प्रश्न सुटतील. इतरांच्या मताला प्राधान्य द्या. शांतपणे निर्णय घ्या. कार्यक्षेत्रात परिश्रमाला पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. स्थावर प्रश्न सुटतील. जमीन-जुमला विषयीचे थंडावलेले व्यवहार गतिमान होतील; परंतु वादविवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल. व्यवसायातील परिस्थिती समाधानकारक राहील. कुटुंबातून पत्नीचे सहकार्य मिळेल. मित्रमंडळी, आप्तेष्ट, नातेवाईक भेटल्यामुळे आनंदात भर पडेल. कोणाशीही मतभेद टाळा. कोणत्याही लहान-मोठ्या आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगणे हिताचे ठरेल.
|
 |
आव्हाने स्वीकारा
मिथुन – सदरील कालावधीमध्ये आपल्याला निरनिराळ्या वेळेस निराळी आव्हाने स्वीकारावी लागतील. ती आव्हाने स्वीकारा. त्याचा आपल्याला भविष्यात फायदा मिळेल. नोकरीमध्ये जास्त काम करावे लागेल. वेळेचे नियोजन फायदेशीर ठरेल. वरिष्ठांची मर्जी राहील. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल; परंतु वादविवादाचे प्रसंग टाळा. शिस्त पाळा. एखादी महत्त्वाची व्यक्ती भेटेल. हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होईल. कुटुंबीयांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. समस्यांचा यशस्वीरीत्या सामना कराल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. |
 |
कार्यमग्न राहा
कर्क – आपण आपल्या कार्यक्षेत्रात अधिक लक्ष दिल्यास आपली कार्ये त्वरेने होतील. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. चालढकल किंवा आळस नको. कार्यमग्न राहणे हिताचे ठरेल. त्याचप्रमाणे नियोजनाचा फायदा मिळेल. व्यवसाय, नोकरी या ठिकाणी सुलभ वातावरण राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळवाल. बोलण्यापेक्षा कृतीला महत्त्व द्या. विद्यार्थ्यांनी अध्ययनात अधिक परिश्रम करण्याची गरज. कुसंगती टाळा. वेळ वाया घालवू नका. गुरुजनांचे मार्गदर्शन तसेच मदत मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रगती करता येईल.
|
 |
उत्साह वृद्धिंगत होईल
सिंह – आपल्या कार्यक्षेत्रात व कौटुंबिक बाबतीत कामाचा ताण जाणवेल; परंतु ही कामे आपण उत्साहाने पार पाडाल. विविध कामांसाठी धावपळ होण्याची शक्यता राहील. कलाकार, साहित्यक्षेत्रातील जातक व विद्यार्थी यांना अनुकूलता मिळेल. कलाकारांना नवीन कामे मिळतील तसेच प्रसिद्धीसह मानसन्मान मिळून धनलाभ होईल. राहत्या घराबद्दलचे प्रश्न सुटतील तसेच राहत्या घरात सुख-सुविधा वाढविण्यासाठी खर्च आनंदाने कराल. नोकरीत वरिष्ठांशी जुळवून घ्या. मित्रमंडळींच्या भेटी होतील.
|
 |
स्पर्धा जाणवेल
कन्या – नोकरी-व्यवसायात स्पर्धक बलवान होतील तसेच हितशत्रूंच्या कारवाया वाढतील. त्यामुळे मनस्तापातच भर पडेल. पण आपण शांत राहा तसेच आपल्या कामाकडे लक्ष द्या. कुटुंबात मित्र मंडळींच्या वर्तुळात कार्यस्थळी वाद-विवाद टाळा. घरातील सदस्यांच्या म्हणण्याला प्राधान्य द्या. किरकोळ वाद-विवादांकडे दुर्लक्ष करा; परंतु आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. महत्त्वाची कामे करू शकाल. यश लाभेल. व्यवसायात नियोजनाला महत्त्व प्राप्त होईल. मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या गाठीभेटी होतील.
|
 |
इतरांना मदत कराल
तूळ – आपल्याजवळील व्यक्तीला किंवा नातेवाइकांपैकी कोणाला तरी आपल्या मदतीची आवश्यकता भासेल. ती मदत आपण स्वतःहून कराल. एखाद्याला काही शिकवून त्याचे हित जोपासाल. जमीन-जुमला, स्थावर मालमत्ताविषयीचे प्रश्न सोडविता येतील. विद्यार्थी वर्गाला त्यांच्या परिश्रमाचे अपेक्षित श्रेय मिळेल. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. कार्यक्षेत्रापेक्षा कुटुंबात आपला वेळ जास्ती जाईल. नावलौकिकात भर पडेल. कुटुंबीयांसमवेत आनंदात वेळ जाईल. आर्थिक बाजू समाधानकारक राहील.
|
 |
प्रसिद्धी व आर्थिक लाभ मिळतील
वृश्चिक – अनुकूल ग्रहमानामुळे अनुकूलतेचा लाभ मिळेल. यश, प्रसिद्धी व आर्थिक लाभ देणारा हा कालावधी असेल. जुन्या गुंतवणुका भरघोस आर्थिक लाभ मिळवून देतील. नव्या गुंतवणुका करताना त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. स्थावर संपत्ती जमीन-जुमला यांचे रेंगाळलेले व्यवहार गतिमान होतील. वरिष्ठांशी बोलताना योग्य शब्दांचा वापर करा. राजकारणात गटबाजी नको. कलाकार व साहित्यक्षेत्रातील जातकांना प्रसिद्धीसह आर्थिक लाभ मिळतील. नावलौकिकात भर पडेल. अनावश्यक खर्च टाळा.
|
 |
मिश्र फळे मिळतील
धनु – मिश्र प्रकारचे ग्रहमान लाभल्यामुळे मिश्र फळे प्रतिपादित होतील. विविध प्रकारच्या कार्यालयीन व कौटुंबिक अडथळ्यांचा अनुभव घ्यायला लागेल. अप्रिय गोष्टींचा अनुभव येईल. काही वेळेस मनाविरुद्ध निर्णय स्वीकारावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचा प्रयत्न करावा. आपल्यातील कलागुणांना चांगले प्रोत्साहन मिळेल. कुटुंबात व मित्र मंडळ यांच्या वर्तुळामध्ये वादविवाद टाळणे हितकारक ठरेल. व्यवसायात आर्थिक देवाण-घेवाणीवरून वादविवादाची शक्यता. व्यवसायातील जुनी येणी वसूल होतील. त्यामुळे आपण आपली कर्जे चुकती करू शकाल.
|
 |
महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील
मकर – बरेच दिवस आपल्या मनातील असलेली एखादी महत्त्वाची इच्छा अथवा महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. त्यासाठी प्रयत्न कमी पडता कामा नयेत याची खबरदारी घ्या. स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होऊ शकते. त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास त्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल. वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक. अति आत्मविश्वास नुकसानीस कारणीभूत ठरू शकतो. लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा. वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. दाम्पत्य जीवनातील वाद-विवाद कलहसदृश्य प्रसंगात बदलू शकतात. प्रवासकार्य सिद्ध होतील.
|
 |
रागावर नियंत्रण आवश्य
कुंभ – रोजच्या दैनंदिन कामात, कुटुंबात व कार्यस्थळी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. काही बाबतीत आपला राग अनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद टाळणे अत्यावश्यक तसेच सहकाऱ्यांना समजून घ्या. त्यांचे पूर्ण म्हणणे ऐकून घ्या. स्वतः शांत राहिल्यामुळे मनावरचा ताण कमी होईल. स्थावर इस्टेट तसेच वडिलोपार्जित संपत्तीबद्दलचे वाद-विवाद संपुष्टात येतील. भावंडांशी समजूतदारपणे वागा. जोडीदाराच्या लहरीपणामुळे वाद-विवाद संभवतात. भागीदाराबरोबर वाद टाळा. |
 |
अनुकूलतेमध्ये भर पडेल
मीन – शुभग्रहांच्या योगामुळे अनुकूलतेमध्ये भर पडेल. नशिबाची साथ मिळाल्याने यशाची वाटचाल करणे सुलभ होईल. आपल्यासमोरील कामे थोड्याच प्रयत्नात होत असल्याचे अनुभव आपल्याला आश्चर्य वाटेल. कामकाजाचा व्याप वाढणार आहे. विरोधकांची भीती बाळगण्याचे कारण नाही. खेळाडू व राजकीय क्षेत्रातल्या जातकांना हा काळ अनुकूल राहील. एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी होता येईल. यशदायी आणि सुंदर अशा कालावधीचा अवश्य लाभ घेता येईल. महत्त्वाची कामे करून घ्या. एखादे अवघड काम अथवा एखादी महत्वकांक्षा पूर्ण होईल.
|