तैवानवर हल्ला झाल्यास अमेरिकन सैन्य संरक्षण करेल

  122

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन आणि तैवानमध्ये तणावाची स्थिती असताना दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तैवानला दिलासा देणारे महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. तैवानवर हल्ला झाल्यास अमेरिकन सैन्य त्यांचे संरक्षण करेल, अशी स्पष्ट भूमिका व्यक्त करत बायडन यांनी चीनला इशारा दिला आहे. एका मुलाखतीत बायडन यांनी तैवानच्या संरक्षणासाठी अमेरिकासोबत असल्याचे स्पष्ट केले.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना मुलाखतीत तैवानबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तैवानच्या संरक्षणासाठी अमेरिकन सैन्य प्रयत्न करणार का, असे विचारले असता त्यांनी होय असे उत्तर दिले. तैवानवर अभूतपूर्व हल्ला झाल्यास अमेरिका त्यांचे संरक्षण करेल असे बायडन यांनी म्हटले.


तैवानबाबत राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अलिकडच्या काळात घेतलेली ही स्पष्ट भूमिका असल्याचे म्हटले जात आहे. तैवानच्या पाठिशी उभे राहण्याची भूमिका अमेरिकेची आहे. मात्र, बायडन यांनी त्यावर आता अधिकच स्पष्ट भूमिका घेतली आहे. यामध्ये आता, अमेरिकन सैन्य तैवानच्या भूमीवर उतरू शकतात, यावर भूमिका घेतली आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनीदेखील अमेरिकेचे तैवानबाबत असलेल्या धोरणात कोणताही बदल झाला नसल्याचे स्पष्ट केले.


बायडन सध्या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराच्या सोहळ्यासाठी ब्रिटनमध्ये आहेत. बायडन यांनी मागील आठवड्यात ‘सीबीएस’ला मुलाखत दिली होती. जवळपास ६० मिनिटांच्या मुलाखतीत बायडन यांनी तैवानचे स्वातंत्र्य, 'वन चायना पॉलिसी' या बाबत कोणतेही भाष्य केले नाही.


दरम्यान, चीन आणि तैवान दरम्यानचा तणाव वाढत आहे. तैवान हा आमचाच भाग असल्याचा दावा चीनकडून सातत्याने केला जातो. चीनकडून 'वन चायना' धोरणाचा अवलंब केला जातो. यानुसार तैवान, हाँगकाँग आणि मकाऊवर चीन आपला अधिकार व्यक्त करतो. चीनसोबतच्या परराष्ट्र, व्यापार संबंध जोडताना दुसऱ्या देशांनाही ‘वन चायना’ धोरणाला पाठिंबा द्यावा लागतो.


तैवानचा दौरा केला होता. या दौऱ्याला चीनने विरोध केला होता. त्यांच्या दौऱ्यावर नाराज असलेल्या चीनने आपली विमाने तैवानच्या हद्दीत घुसवली होती. २१ चिनी लष्करी विमानांनी एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन (एडीआयझेड) मध्ये प्रवेश केला. चीनने आपले केजे ५०० एडब्ल्यूसीएस विमान आणि जेएफ १६, जेएफ११, वाय९ इडब्ल्यू आणि वाय ८ ईएलआयएनटी विमान तैनात केले होते. चीनचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि हितसंबंध कमी करण्यासाठी अमेरिका जबाबदार असेल आणि याची किंमत अमेरिकेला मोजावी लागेल, असा इशाराही चीनने दिला होता.
Comments
Add Comment

२६/११ हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाच्या कोठडीत १३ ऑगस्टपर्यंत वाढ!

नवी दिल्ली: मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाच्या न्यायालयीन कोठडीत १३ ऑगस्टपर्यंत वाढ

मोठी बातमी : राजस्थानच्या चुरुमध्ये वायूसेनेचं विमान कोसळलं; २ मृतदेह आढळल्याची माहिती

चुरु (राजस्थान) : राजस्थानच्या चुरुमधील रतनगढ भागातील भानुदा गावात आज भारतीय हवाई दलाचं एक विमान दुर्घटनाग्रस्त

राजस्थानमध्ये हवाई दलाचे जग्वार विमान कोसळले, वैमानिकांचा मृत्यू

चुरू : राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील भानुदा गावाजवळ बुधवारी भारतीय हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळले. या

गुजरातमध्ये पूल कोसळला; ३ मृत्यू, अनेकजण बेपत्ता

नदीत दोन ट्रक, एक बोलेरो आणि इतर काही वाहने पडली अहमदाबाद

टेक वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा धक्कातंत्र! जॅक डोर्सीचं 'बिटचॅट' अ‍ॅप लॉन्च; इंटरनेट, नेटवर्कशिवाय मेसेजिंग शक्य

मुंबई : ट्विटर आणि ब्लॉकचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी एक क्रांतिकारी 'बिटचॅट' अ‍ॅप आणले आहे . या अ‍ॅपची खास गोष्ट

Bharat Bandh News : उद्या भारत बंदची मोठी घोषणा, शाळा, बँका... काय काय बंद राहणार?

२५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार नवी दिल्ली : बँका, विमा, टपाल, कोळसा खाणी, महामार्ग आणि बांधकाम क्षेत्रातील अंदाजे