मुंबई : राज्यात महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला संपवले असून; शिवसेना पक्ष आता चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. आता तरी शिवसेनेने डोळे उघडावे आणि एकनाथ शिंदे यांचे बंड किती योग्य होते हे स्पष्ट झाले, अशी टीका भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दरम्यान केली.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. या निकालांमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर दिसून येत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. तर लोकांकडून शिंदे यांच्या शिवसेनेला पसंती मिळत आहे, त्यामुळे शिंदे यांचे बंड योग्यच होते, असा दावा भाजपचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार केला.