Wednesday, January 15, 2025
Homeताज्या घडामोडीचंदीगड विद्यापीठ २४ सप्टेंबरपर्यंत बंद; आंदोलन मागे

चंदीगड विद्यापीठ २४ सप्टेंबरपर्यंत बंद; आंदोलन मागे

चंदीगड : वसतिगृहातील ६० मुलींच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी बिघडलेल्या वातावरणामुळे आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन विद्यार्थ्यांनी रविवारी दुपारी मागे घेतले आहे. डीआयजी, प्रशासनाने विद्यार्थ्यांना निष्पक्ष तपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेत असल्याची घोषना केली. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने आठवडाभरासाठी वर्ग स्थगित केले आहेत. विद्यापीठातील आंदोलनानंतर विद्यार्थ्यांचे पालकही मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी पोहोचले आहेत.

चंदीगड विद्यापीठ प्रशासनानेही विद्यार्थ्यांच्या प्रत्येक समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. वसतिगृहातील सर्व वॉर्डनच्या बदलीची मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यापीठ, पोलिस प्रशासनाने या प्रकरणासाठी विद्यार्थ्यांना समिती स्थापन करण्याचे आवाहन केले होते, त्यानंतर समिती स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांव्यतिरिक्त चंदीगड विद्यापीठ व्यवस्थापनाचे अधिकारीही सहभागी होणार आहेत.

आंदोलन संपल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने परिपत्रक जारी करून १९ ते २४ सप्टेंबर या कालावधीत वर्ग स्थगित करण्याचे जाहीर केले आहे. यादरम्यान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नेहमीप्रमाणे कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

एमएमएस प्रकरणी शिमला येथून तरुण पोलिसांच्या ताब्यात

पंजाबमधील मोहाली येथील चंदीगड विद्यापीठातील एमएमएस प्रकरणी पोलिसांनी शिमला येथून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती देताना डीएसपी रुपिंदरदीप कौर यांनी सांगितले की, काल रात्री या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली होती आणि सुत्रांच्या आधारे आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. शिमला जिल्हा पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. पंजाब पोलिसांच्या विनंतीवरून हिमाचल प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थीनींचे आंघोळ करतानाचे व्हीडिओ व्हायरल झाल्याच्या घटनेनंतर एमएमएस बनवणाऱ्या तरुणीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी या तरुणीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आरोपी तरुणी अनेक दिवसांपासून विद्यार्थिनींचे व्हीडिओ बनवत होती आणि तिच्या ओळखीच्या तरुणाला पाठवत होती, असा आरोप आहे. या तरुणाने हे व्हीडिओ इंटरनेटवर टाकले असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी रविवारी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -