Sunday, August 31, 2025

राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

मुंबई : राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ५१ तालुक्यांतल्या ६०८ ग्रामपंचायतींसाठी आज निवडणुक होणार आहे. यासोबत आजचे थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक होणार असल्याने निवडणुकांच्या निकालाबाबत राज्यातील जनतेला मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.

ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच पदासाठीच्या या सार्वत्रिक निवडणुका आहेत. यात नंदुरबार जिल्ह्यामधील सर्वाधिक म्हणजे १३९ तर यवतमाळ जिल्ह्यातील ७२ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होत आहेत. आज सकाळी ७.३० पासून ते सायंकाळी ५.३० पर्यंत या निवडणुकीसाठा मतदान करता येणार आहे. या निवडणुकीचा निकाल १९ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या:

नंदुरबार: शहादा- ७४ व नंदुरबार- ७५. धुळे: शिरपूर- ३३. जळगाव: चोपडा- ११ व यावल- ०२. बुलढाणा: जळगाव (जामोद)- ०१, संग्रामपूर- ०१, नांदुरा ०१, चिखली- ०३ व लोणार- ०२. अकोला: अकोट- ०७ व बाळापूर ०१. वाशीम : कारंजा- ०४. अमरावती धारणी- ०१, तिवसा- ०४, अमरावती- ०१ व चांदुर रेल्वे- ०१. यवतमाळ : बाभुळगाव- ०२, कळंब- ०२, यवतमाळ- ०३, महागाव - ०१. आर्णी- ०४, घाटंजी - ०६, केळापूर २५. राळेगाव- ११, मोरेगाव- ११ व झरी जामणी- ०८. नांदेड: माहूर- २४, किनवट- ४७, अर्धापूर- ०१. मुदखेड - ०३, नायगाव (खैरगाव)- ०४, लोहा- ०५, कंधार- ०४, मुखेड- ०५, व देगलूर - ०१. हिंगोली : (औंढा नागनाथ)- ०६. परभणी : जिंतूर- ०१ व पालम - ०४. नाशिक : कळवण- २२, दिंडोरी- ५० व नाशिक १७. पुणे: जुन्नर- ३८, आंबेगाव- १८, खेड- ०५ व भोर- ०२. अहमदनगर: अकोले- ४५. लातूर: अहमदपूर ०१. सातारा: वाई - ०१ व सातारा- ०८. व कोल्हापूर : कागल- ०१.

Comments
Add Comment