Monday, June 30, 2025

दसरा मेळाव्याच्या मैदानासाठी शिंदे गटाचा अर्ज स्विकारला तर शिवसेनेचा फेटाळला!

दसरा मेळाव्याच्या मैदानासाठी शिंदे गटाचा अर्ज स्विकारला तर शिवसेनेचा फेटाळला!

मुंबई : शिवसेना आणि शिंदे गट दोघांनीही दसरा मेळाव्यासाठी दादरचे शिवाजी पार्क हे मैदान मिळावे यासाठी अर्ज केला होता. मात्र अद्याप मुंबई महानगरपालिकेने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. अशातच आता शिंदे गटाने वांद्रे कुर्ला संकुलातल्या एमएमआरडीए मैदानासाठी केलेला अर्ज महापालिकेने स्विकारला आहे. तर शिवसेनेचा बीकेसीतल्या मैदानाचा अर्ज हे मैदान आरक्षित असल्याने फेटाळला आहे.


शिवसेनेच्या स्थापनेपासून दादरच्या शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेतला जातो. मात्र यंदाच्या बंडाचा फटका बसल्याने अद्याप दसरा मेळाव्याबद्दल काहीही निर्णय झालेला नाही. शिंदे गटानेही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन हे मैदान कोणाला मिळणार याबद्दल कोणताही निर्णय महापालिकेने दिलेला नाही. त्यामुळे आता दसरा मेळाव्याचे काय होणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

Comments
Add Comment