Thursday, March 20, 2025
Homeमहाराष्ट्रकुशल मनुष्यबळ ही काळाची गरज : मंगलप्रभात लोढा

कुशल मनुष्यबळ ही काळाची गरज : मंगलप्रभात लोढा

नाशिक (प्रतिनिधी) : कुशल मनुष्यबळ ही काळाची गरज झाली आहे आणि ज्याच्याजवळ कुशल मनुष्यबळ आहे, त्यांनी त्यांना सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. एम्पॉवरमेंट ब्युरो विभागाची तुम्ही मदत घेऊ शकता त्यांच्या साह्याने राज्यांमध्ये तुम्ही छोटे कौशल्य विकास सेंटर सुरू करावे, इंक्युबॅशन सेंटर सुरू करावे तरुणांना प्रशिक्षित करून उद्योग व्यापार करण्यासाठी मदत करावी या उद्देशाने काम करावे. महाराष्ट्र शासनाचा कौशल्य विकास विभाग तुम्हाला पूर्ण सहकार्य करेल, तुमच्या पाठीशी असेल. तसेच महिला बालविकास विभागाचे काम माझ्याकडे असून एक लाख दहा हजार अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांना आपण मदत करणे आवश्यक आहे.

महिला बाल सुधार गृहातील महिला व तरुणी आहेत त्यांच्यासाठी कौशल्य सेंटर सुरू करावे त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन पर्यटन व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांनी केले. तसेच महाराष्ट्र चेंबरतर्फे राज्यात व्यापार उद्योगाच्या वाढीसाठी सुरू असलेले उपक्रम विशेषता तरुणांसाठी व महिलांसाठी कौशल्य विकास व महिला उद्योजकता समितीतर्फे सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले व राज्यात कौशल्य विकास उपक्रम राबवण्यासाठी महाराष्ट्र चेंबरला सहकार्याचे आश्वासन अध्यक्ष ललित गांधी यांना दिले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरतर्फे राज्यस्तरीय परिषदेत युवा सक्षमीकरणासाठी कौशल्य विकासाची भूमिका आणि राष्ट्र निर्माण या विषयावर महाराष्ट्र सरकारचे पर्यटन व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली परिषद संपन्न झाली. सुरुवातीला महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधीयांनी पर्यटन व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांचे स्वागत केले. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रास्ताविक करताना राज्यस्तरीय उद्योग परिषदेची सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्र चेंबर स्वातंत्र्यपूर्व काळापासून राज्याच्या व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच राज्यातील व्यापार उद्योगाला जागतिक स्तरावर संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र चेंबरने केलेल्या कार्याची माहिती दिली.

महाराष्ट्र चेंबरच्या महोत्सवी वर्षापर्यंतच्या ६ वर्षांची ब्लू प्रिंट सादर केली. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या ६ विभागासाठी महिला उद्योजिका क्लस्टर, कृषिपूरक उद्योगांचे क्लस्टर व उत्पादन आधारित उत्पादनांचे ६ क्लस्टर चेंबरच्या पुढाकाराने उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्रचेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, मुख्य पाहुणे नाम. मंगलप्रभात लोढा, पर्यटन व कौशल्य विकास मंत्री, महाराष्ट्र सरकार वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष सौ. शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रवींद्र मानगावे, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, उपाध्यक्ष तनसुख झांबड, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे चेअरमन विजय कलंत्री उपस्थित होते. परिषदेला व्यापारी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -