Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीसाताऱ्यात मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान धावपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

साताऱ्यात मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान धावपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सातारा : सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान एका धावपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे. कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरात राहणाऱ्या राज क्रांतीलाल पटेल (वय ३२) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता.

समोर आलेल्या माहितीनुसार ही संपर्ण घटना सातारा हाफ हिल मॅरथॉन स्पर्धा सुरु असताना घडली. मॅरथॉन स्पर्धा सुरु झाल्यानंतर स्पर्धेच्या परतीच्या मार्गादरम्यान ही दुर्देवी घटना घडली. स्पर्धक सातारा ते कांस रोड आणि पुन्हा कांस रोड ते पोलीस परेड ग्राऊंड अशा परतीच्या मार्गावर होते. त्याच दरम्यान अचानकपणे राज याच्या छातीत दु:खायला लागले, त्यामुळे तो त्याठिकाणी जागेवर पडला. ज्यानंतर त्याचजागी त्याचा जागेवर मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. घटना घडल्यानंतर त्याला प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्नही करण्यात आला पण तोवर त्याचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर त्याचा मृतदेह सातारा शासकीय रुग्णालय याठिकाणी नेण्यात आले.

सातारा हाफ हिल मॅरेथॉन ही सातारा जिल्ह्यातील एक भव्य अशी मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळखली जाते. मोठ्या प्रमाणात स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होत असतात. आसपासच्या जिल्ह्यातील स्पर्धकही स्पर्धेत सहभाग घेत असतात. राज हा देखील कोल्हापूरचा असून या स्पर्धेत सहभागी झाला होता. पण त्याचा असा अचानकपणे मृत्यू झाल्याने स्पर्धेला एकप्रकारे गालबोट लागले आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेमुळे स्पर्धकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे राज एक राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू असल्याचंही समोर आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -