दीपक परब
गावातील महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडील पैसा लुबाडणारा बोगस डॉ. अजितकुमार देव आता हिंदी प्रेक्षकांना थरार दाखवणार आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेच्या पहिल्या भागाचे हिंदी भाषेत डबिंग करून ही मालिका अँड टीव्हीवर दाखल होणार आहे. येत्या २४ सप्टेंबरपासून ‘देवमाणूस’ आता ‘हैवान’ या नावाने हिंदी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कधी डॉ. अजितकुमार देव, तर कधी देवी सिंग बनून गावातील सुंदर महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणारा ‘देवमाणूस’ मराठी मालिका विश्वात लोकप्रिय झाला.
नुकताच ‘देवमाणूस’ या मालिकेचा दुसरा सीझन संपला. तर या मालिकेच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यश मिळवले होते. ‘देवमाणूस’ मालिका आता पुन्हा छोट्या पडद्यावर येणार असून ती हिंदी रूपात. ‘हैवान’ नावाने या मालिकेच्या पहिल्या भागाचे हिंदी रूपांतर अँड टीव्हीवर दाखवण्यात येणार आहे. २४ सप्टेंबरपासून ही मालिका रात्री आठ वाजता हिंदी भाषेतील छोट्या पडद्यावर दिसणार आहे. सातारा जिल्ह्यातील डॉ. संतोष पोळ याने केलेले खून प्रकरण सत्र खूप गाजले होते. अजूनही डॉ. पोळ याची कोर्टात सुनावणी सुरू आहे. डॉ. पोळ याच्या जीवनाशी साधर्म्य असलेली ‘देवमाणूस’ ही मालिका दोन वर्षांपूर्वी मराठीत छोट्या पडद्यावर दाखल झाली. डॉ. अजितकुमार देव या नावाने गावात आलेला एक बोगस डॉक्टर कशाप्रकारे गावातील महिलांना नादाला लावतो. त्यांच्याकडील दागिने, पैसे, जमीन लुटतो आणि त्यांना मारून टाकतो अशी ही गोष्ट होती. ‘देवमाणूस’ मालिकेच्या पहिल्या भागाने मराठी मालिका विश्वातील सगळे टीआरपी रेकॉर्ड ब्रेक केले.
डिंपल, बाबू काका, मंगलताई, सरू आजी, टोन्या, रूपा, बज्या, नाम्या, मंजू, विजयभाऊ, रेश्मा, अपर्णा, इन्स्पेक्टर दिव्या सिंग, वकील आर्या ही पात्रं तुफान लोकप्रिय झाली. डॉ. अजितकुमार देव याच्या भूमिकेत किरण गायकवाड याने मोठा चाहता वर्ग निर्माण केला. प्रमुख भूमिकेतील किरणचा अभिनय प्रेक्षकांना आवडला. या मालिकेतील सरू आजीच्या शिव्यांनी तर खूपच प्रसिद्धी मिळवली. आता हा सगळा खेळ हिंदी भाषिक प्रेक्षकांनाही पाहायला मिळणार आहे. अनेक मराठी प्रेक्षकांनी ‘देवमाणूस’ टीमचे कौतुक केले आहे.
कोरोनाच्या भीषण आणि धीरगंभीर काळात लोकांना पोटभर हसवून सारं टेन्शन दूर करणारा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या माध्यमातून व त्यापूर्वी ‘कॉमेडीची जीएसटी एक्स्प्रेस’, ‘तुमच्यासाठी काही पण’ अशा कार्यक्रमांतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला विनोदी अभिनेता ओंकार भोजने आता नवी भरारी घेण्यास सज्ज झाला आहे. कॉमेडीचे परफेक्ट टायमिंग आणि ‘अगं अगं आई, बाबा ओरडू ओरडू, मला घाबरू घाबरू…’ या ‘हास्यजत्रेतील ओंकारच्या संवादाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. आता हाच कॉमेडी किंग लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सरसावला आहे.
सानवी प्रॉडक्शन हाऊस निर्मिती असलेल्या एका बिग बजेट मराठी चित्रपटात ओंकार भोजने प्रथमच मुख्य नायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. या निमित्ताने एका वेगळ्या अंदाजात तो चाहत्यांसमोर येणार आहे. नुकतेच या चित्रपटाच्या पहिल्या टप्प्यातील चित्रीकरण पार पडले असून या आगामी चित्रपटात ओंकारसोबत मराठीतील दिग्गज कलाकार असल्याचेही समोर आले आहे. ‘आटपाडी नाईट्स’ फेम लेखक, दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर हे या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, या चित्रपटाचे चित्रीकरण शेवटच्या टप्प्यात आहे. चित्रपटाचे पहिले शेड्यूल भोर परिसरात मोठ्या उत्साहात नुकतेच पार पडले. आरती चव्हाण यांची निर्मिती असलेल्या या आगामी बिग बजेट मराठी चित्रपटाचे नाव, तसेच ओंकार भोजनेसोबत कोणती नायिका झळकणार याची माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात
आली आहे.
वेगळी अन् हटके भूमिका
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना ओंकार भोजने म्हणाला की, ‘मी आजवर टीव्ही किंवा चित्रपटात साकारलेल्या भूमिकांपेक्षा या व्यक्तिरेखेची शेड एकदम वेगळी आहे. त्यासोबतच मी एका गोड आणि चांगल्या अभिनेत्रीचा हिरो बनतोय याचा आनंद आहे. या चित्रपटाचा नायक ज्या वयाचा आणि ज्या भावनिक विश्वात आहे, त्याच अवस्थेत मी आहे, हे मला चित्रपटाचे नरेशन सुरू झाले तेव्हाच जाणवले. त्यामुळे मी ठरवले की, हे पात्र दिग्दर्शकाला जसे हवे होते, तसे साकारण्याचा पुरेपूर प्रयत्न मी केला असून मला संपूर्ण टीमची मदत झाली. मी एकांकिका करताना जशी एनर्जी असायची तशीच एनर्जी मला या सेटवर जाणवली. त्यामुळेच काम करताना खूप धमाल आली’.
‘बिग बॉस मराठी’ हा छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त कार्यक्रम आहे. पण तरीही या कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. ‘बिग बॉस मराठी’ची तिन्ही पर्व सुपरहिट ठरल्यानंतर प्रेक्षक चौथ्या पर्वाची प्रतीक्षा करत होते. पण आता चौथ्या पर्वाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. ‘बिग बॉस’ मराठीचे तिन्ही सीझन महेश मांजरेकरांनी चांगलेच गाजवले आहेत. त्यांची बोलण्याची आणि स्पर्धकांची शाळा घेण्याची शैली प्रेक्षकांना विशेष आवडली. पण आता नव्या सीझनमध्ये मांजरेकर वेगळी शाळा घेणार असल्याने प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. महेश मांजरेकरांनी प्रोमो शेअर करत या संदर्भात माहिती दिली असून मांजरेकर म्हणतात,‘होस्ट जरी असलो तरी अनेक भूमिका आपल्याला कराव्या लागतात. कधी पोस्टमन बनून मायबाप प्रेक्षकांच्या सूचना स्पर्धकांपर्यंत पोहोचवाव्या लागतात, तर कधी खेळाचा गुंता सोडवणारा तटस्थ हंपायर. कधी शाळेतला कडक मास्तर.
कुटुंबप्रमुख म्हटल्यावर जरा शिस्त आणि शांती ही जपावीच लागणार. तरच घराचे घरपण टिकते…’ प्रोमो शेअर करत मांजरेकरांनी लिहिले आहे, ‘१०० दिवसांचा हा खेळ… कधी पास तर कधी फेल…पण महेश मांजरेकरांच्या मते यंदा ‘ऑल इज वेल…’ पाहायला विसरू नका ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड प्रीमिअर २ ऑक्टोबरला संध्या. ७ वा, सोम-शुक्र. रात्री ९.३० वाजता फक्त कलर्स मराठीवर होणार आहे. बिग बॉस मराठीचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चौथ्या पर्वाचा प्रीमिअर २ ऑक्टोबरला झाल्यानंतर २ ऑक्टोबरपासून सोम-शुक्रवार रात्री १० वा. आणि रविवारी रात्री ९.३० वा. प्रेक्षकांना हा बहुचर्चित कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…