Monday, June 16, 2025

पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्णय

पुणे : महापालिका निवडणुकासाठी सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणीसाठी आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कोअर कमिटीची बैठक पार पडली. आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.


कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये पुणे महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याची मागणी केली होती. कार्यकर्त्यांच्या तसेच सर्व नेतेमंडळींच्या आग्रही मागणीमुळे येणारी पुणे महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली.


त्याबरोबर निवडणुकीसाठी इच्छुकांनी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात प्रभागाची व पक्ष संघटनेची बांधणी करण्यास सुरूवात करावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा