Friday, October 4, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेजलालपूर मतदारसंघाची जबाबदारी माजी आमदार नरेंद्र पवारांच्या खांद्यावर

जलालपूर मतदारसंघाची जबाबदारी माजी आमदार नरेंद्र पवारांच्या खांद्यावर

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी ‘मिशन गुजरात’

कल्याण (वार्ताहर) : कल्याण पश्चिममध्ये माजी आमदार तथा भाजप भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांच्यावर गुजरात निवडणुकीच्या आनुषंगाने भाजपने मोठी जबाबदारी टाकली आहे. येत्या डिसेंबर अखेरपर्यंत गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीची शक्यता आहे, भाजपच्या महत्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या गुजरातमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलवण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

त्याच मिशनचा भाग म्हणून नरेंद्र पवार यांना गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील जलालपूर विधानसभेच्या प्रभारीपदी निवड केली आहे. निवड झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रभारी मतदारसंघात जात नरेंद्र पवार यांनी कामकाजाला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील बूथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, जिल्हा पदाधिकारी, सर्व मोर्चा, आघाड्या आणि नेत्यांच्या भेटी व बैठकी घेत संघटनात्मक आढावा घेणे सुरू आहे. बूथ नियोजनापासून ते मतदानापर्यंत लहान लहान गोष्टींवर चर्चा करण्यात येत आहे.

नरेंद्र पवार हे शांत संयमी आणि मितभाषी आहेत. कल्याण पश्चिमचा आमदार म्हणून अत्यंत चांगले काम केल्यानंतर भाजपने त्यांना प्रदेश सचिव केलेले तसेच सध्या त्यांच्यावर भाजपच्या भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश संयोजक पदाची मोठी जबाबदारी आहे. या अगोदर बिहार आणि पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना पक्षाने प्रभारी म्हणून पाठवले होते, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी चांगले काम केल्याने भाजपने त्यांना पुन्हा एकदा ‘मिशन गुजरात’साठी पाठवले आहे.

मी भाजपचा एक कार्यकर्ता आहे, पक्षाला माझी जिथे आवश्यकता वाटेल तिथे जाण्याची आणि पक्ष जे सांगेल ते काम करण्याची माझी पूर्णतः तयारी आहे. कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा आनंद वेगळा असतो, अनेक निवडणुकांत आम्ही हे काम सातत्याने करत आलो आहोत, गुजरातमध्ये सुद्धा अत्यंत सूक्ष्म नियोजन करून मला नेमून दिलेल्या मतदारसंघात निश्चितपणे विजय मिळवून देऊ याची तयारी सुरू आहे. – नरेंद्र पवार, माजी आमदार

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -