
मुंबई : मराठवाडा मुक्ती संग्रामच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक पत्र लिहित हा दिवस सणासारखा साजरा झाला पाहिजे, ट्विटर वरुन एक पत्र शेअर करत असे आवाहन केले आहे.
राज ठाकरेंनी म्हटले आहे की, आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचे अखंडत्वच धोक्यात आले असते. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरे तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/RajThackeray/status/1571001027171872773