Share
  • माधव भांडारी

आपले पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला असून जागतिक व्यासपीठावर आपले एक स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. आपले पहिले पंतप्रधान पं. नेहरू, श्रीमती इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सन्मान मिळत असे. आज मोदीजी सुद्धा त्या रांगेत जाऊन पोहोचले आहेत. काही सन्मान तर असे आहेत की, भारतीय पंतप्रधान म्हणून ते मोदीजींनाच पहिल्यांदा मिळाले आहेत. उदा. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणारे मोदीजी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. संयुक्त राष्ट्र संघ (UNO) या संघटनेच्या स्थापनेनंतर आणि स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच गेल्या वर्षी, ९ ऑगस्ट २०२१ रोजी भारताच्या पंतप्रधानांना ही संधी मिळाली. काही देशांना भेट देऊन त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करणारे मोदीजी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. असे संबंध प्रस्थापित करत असताना त्यांनी अनेक रूढ समजुती खोट्या ठरवल्या आहेत.

पाच वर्षांपूर्वी, जुलै २०१७ मध्ये मोदीजींनी इस्रायलला भेट दिली. इस्रायलच्या भूमीवर पाऊल ठेवणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान होते. ‘अरब राष्ट्रांना चालत नाही, त्यांचे मन दुखवायला नको, नाहीतर ते आपल्याला तेल देणार नाहीत’ अशी भीती बाळगून, त्याचबरोबर देशातील व देशाबाहेरील मुस्लीम समुदायाच्या भावना जपण्यासाठी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ३५/४० वर्षे आपण इस्रायलशी संबंध प्रस्थापित केले नव्हते. तरी गेली अनेक वर्षे आपण इस्रायलकडून शस्त्रास्त्रे, अन्य संरक्षण साहित्य खरेदी करत आहोत. १९६२च्या चीन युद्धापासून आजतागायत प्रत्येक संघर्षाच्या काळात इस्रायल आपल्याबरोबर उभा राहिला. बालाकोट सर्जिकल स्ट्राइकसाठी वापरलेले स्पाइस बॉम्ब्स असोत, नाही तर बीएसएफ जवानांच्या वापरातील खास जीपगाड्या, ही सर्व अत्याधुनिक साधने इस्रायलच आपल्याला पुरवत असतो. तरीही मुस्लीम राष्ट्रांच्या भीतीमुळे आपण इस्रायलपासून अंतर राखून होतो. ती परिस्थिती मोदीजींनी बदलून टाकली. मोदीजी जेव्हा इस्रायलच्या दौऱ्यावर गेले, तेव्हाही हीच भीती दाखवली गेली की, आता अरब देश, विशेषत: गेली अनेक वर्षे मैत्रीचे संबंध असलेल्या पॅलेस्टाइनबरोबरचे भारताचे संबंध बिघडतील. प्रत्यक्षात काय घडले? तर मोदीजींच्या त्या गाजलेल्या इस्रायल भेटीनंतर ‘Grand Collar of state of Palestine’ हा आपला सर्वोच्च पुरस्कार देऊन पॅलेस्टाइनने मोदीजींचा सन्मान केला. इस्रायलने भारताला केलेल्या शस्त्रास्त्र पुरवठ्यामुळे मध्य पूर्व आशियातील मुस्लीम राष्ट्रांच्या वागणुकीत काय फरक पडला? ती किती दुखावली गेली? तर संयुक्त अरब अमिरातीने त्यांचा ‘Order of Zayed’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मोदीजींना दिला, बहारीनने त्यांच्या ‘King Hamad Order of Renaissance’ पुरस्काराने मोदीजींचा सन्मान केला, कतारचे अमीर भारताच्या राष्ट्रपती भवनात आले. गेल्या आठ वर्षांमध्ये कतारच्या व्यावसायिक क्षेत्रात भारतीय कंपन्यांचे अस्तित्व व प्रभाव नजरेत भरण्याइतका वाढला आहे. आज अनेक अरब देश रुपया थेट चलन म्हणून स्वीकारायला लागले आहेत. कलम ३७० रद्द केल्यानंतर बहुतेक सर्व अरब देशांनी ‘हा भारताचा अंतर्गत विषय आहे’ अशी समर्थनाची भूमिका घेऊन पाकिस्तानला वाऱ्यावर सोडून दिले. एवढेच नाही, तर मुस्लीम राष्ट्रांच्या परिषदेचे व्यासपीठ भारताच्या विरोधात वापरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानलाच त्या परिषदेतून निघून जाण्याची वेळ ह्या देशांनी आणली.

दरम्यानच्या काळात रशियाच्या सर्वेसर्वा पुतिन यांनी‘Order of St. Andrew the Apostle’ हा रशियाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार मोदीजींना दिला. भारताने रशियाबरोबर मैत्रीचे संबंध ठेवलेले अमेरिकेला आवडत नाहीत. त्याबद्दल अमेरिका भारताला दमदाटी करण्याचा प्रयत्न नेहेमी करत असते. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून भारताने शस्त्रास्त्रे किंवा तेल घेतल्यास भारतावर आर्थिक निर्बंध घालण्याची धमकी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी दिली होती. तिच्याकडे लक्ष न देता भारताने आपल्याला हवे असलेले करार रशियाबरोबर केले, रशियाकडून तेल घेणे सुरूच ठेवले आणि त्यानंतर अमेरिकेने त्यांच्या संसदेत ठराव करून भारताला याबाबतीत अमेरिकन कायद्यातून सूट देणारी विशेष सवलत देऊ केली. आज दक्षिण अमेरिकेतील बहुतेक देश मोदीजींच्या नेतृत्वाचे समर्थक, प्रशंसक आहेत. भारतीय नेतृत्वाच्या संदर्भात जागतिक राजकारणात आजवर कधीही पाहायला न मिळालेले असे हे चित्र आहे.

कोरोनाच्या काळात जगातील १०१ देशांना भारताने कोविड प्रतिबंधक लस आणि औषधे मुबलक प्रमाणात पुरवली. अन्नधान्य टंचाईशी झगडणाऱ्या अनेक देशांना धान्यपुरवठा केला. श्रीलंकेपासून बांगलादेशपर्यंत अनेक देशांना आर्थिक मदत दिली. हे सर्व करत असताना चीनने चालवलेल्या कुरापतखोर कारवायांना पायबंद घालण्यासाठी चीनच्या विरोधात प्रभावी आंतरराष्ट्रीय फळी तयार केली. ह्या व अन्य विविध कारणांमुळे आज जागतिक राजकारणात भारताचा दबदबा निर्माण झाला आहे. भारत एक महासत्ता बनू शकतो, असे वातावरण तयार झाले आहे. हे वातावरण तयार होण्यात मोदीजींच्या नेतृत्वाचा व कर्तृत्वाचा फार मोठा वाटा आहे.

‘मोदी हैं, तो मुमकिन हैं’ ही आज भारतातील बहुसंख्य जनतेची भावना आहे. आज वयाची बहात्तर वर्षे पूर्ण करणाऱ्या मा. मोदीजींना देशभरातील जनतेबरोबरच हार्दिक शुभेच्छा देऊ या!!!

(लेखक महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष आहेत)

Recent Posts

UGC NET Exam : पेपरफुटी प्रकरणाला बसणार लगाम! आता ‘या’ पद्धतीने होणार परीक्षा

परीक्षेत नव्या विषयाची पडणार भर; तारखा जाहीर मुंबई : यूजीसी नेटचा पेपर (UGC NET Exam)…

3 mins ago

RBI Action : आरबीआयचा अ‍ॅक्शन मोड! नियमांचे उल्लंघन केलेल्या ‘या’ बँकेवर लाखोंची कारवाई

मुंबई : देशातील आर्थिक डबघाईला आलेल्या बँकांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर आरबीआय (RBI) नेहमीच महत्त्वाची…

47 mins ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक २९ जून २०२४.

पंचांग आज मिती ज्येष्ठ कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा. योग शोभन. चंद्र राशी…

7 hours ago

जनहितैषी अर्थसंकल्प!

ज्या अर्थसंकल्पाची महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता व आतुरता होती, तो अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार…

10 hours ago

एनडीए सरकारचा नवा संकल्प हवा

रवींद्र तांबे केंद्रात सरकार स्थापन झाले की, सर्वांचे लक्ष लागलेले असते ते म्हणजे देशाच्या केंद्रीय…

11 hours ago