नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचे माजी दिग्गज खेळाडू मार्क बाऊचर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ट्रेव्हर बेलिस यांच्या खांद्यावर पंजाबच्या हेड कोचपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
गत मोसम मुंबई इंडियन्ससाठी निराशाजनक ठरला. त्या हंगामात महेला जयावर्धने यांच्या खांद्यावर मुंबईच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी होती. शुक्रवारी मुंबई इंडियन्सने मुंबई इंडियन्सने मुख्य प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचे माजी दिग्गज खेळाडू मार्क बाऊचर यांची नियुक्ती केली. मात्र महेला जयवर्धने फ्रँचायझीशी कनेक्ट राहणार असून त्यांच्याकडे इतर काही मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
या नियुक्तीनंतर बाऊचर म्हणाले की, ‘मी या मिळालेल्या जबाबदारीमुळे खूप उत्साहित आहे आणि माझ्याकडून अपेक्षित असलेल्या निकालांचा मी आदर करतो. ही एक मजबूत अशी युनिट टीम आहे, ज्यात अनेक महान खेळाडू आणि चांगले नेतृत्व असलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. मी या डायनॅमिक युनिटला अधिक चांगले देण्यासाठी उत्साहित आहे.
पंजाब किंग्जनेही कोच अनिल कुंबळेला संघाच्या हेड कोच पदावरून हटवले आणि २०१९ विश्वचषक दरम्यान इंग्लंड संघाचे कोच असलेल्या ट्रेव्हर बेलिस यांच्याकडे पंजाब किंग्जची जबाबदारी सोपवली आहे.
पंजाबचे नवे कोच ट्रेव्हर बेलिस यांनी सांगितले की, “पंजाब किंग्जच्या हेड कोच पदाची जबाबदारी मिळाल्याने मी माझा सन्मानच समजतो. एक फ्रँचायझी ज्याला यशाची भूक आहे. ट्रॉफी जिंकण्यासाठी उत्सुक असलेल्या खेळाडूंच्या या प्रतिभावान संघासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.