मुंबई : लोअर परळ पुलाचा गर्डर उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेने गुरुवारी मध्यरात्री चार तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. हा गर्डर उभारण्यासाठी गुरुवारी रात्री १.१० ते शुक्रवारी पहाटे ५.१० वाजेपर्यंत सर्व मार्गिकांवर हा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत काही लोकल फे-या रद्द करण्यात येणार असून काही लोकल फे-यांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहेत.
ब्लॉक कालावधीत गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजता बोरिवली- चर्चगेट आणि १.०५ वाजता विरार चर्चगेट धीमी लोकल अंधेरी ते मुंबई सेंट्रलदरम्यान जलद चालवण्यात येणार आहे.
पहाटे ४.१५ वाजता चर्चगेट- विरार धीमी लोकल ४.३६ वाजता दादरहून आणि ४.३८ चर्चगेट- बोरिवली धीमी लोकल ५.०८ वाजता वांद्रे येथून सुटणार आहे.
रात्री 3.25 वाजता विरार-चर्चगेट, 3.40 वाजता नालासोपारा- बोरिवली धीमी, पहाटे 4.05 वाजता भाईंदर-चर्चगेट जलद लोकल, 3.53 वाजता विरार- चर्चगेट जलद या लोकल 15 मीनिटे उशिराने धावणार आहेत.
बोरिवली – चर्चगेट लोकल रद्द करुन ही लोकल पहाटे 4.45 वाजता मालाड-चर्चगेट अशी विशेष लोकल धावणार आहे.
पहाटे 4.02 वाजता बोरिवली-चर्चगेट धीमी लोकल दादरपर्यंत चालवण्यात येणार आहे. ही लोकल माटुंगा रोड आणि माहिम स्थानकात थांबणार नाही.
पहाटे 4.14 वाजता बोरिवली-चर्चगेट धीमी लोकल वांद्रे स्थानकापर्यंत धावणार आहे. याच स्थानकातून या लोकलचा परतीचा प्रवास सुरु होईल.
या लोकल रद्द
चर्चगेट-अंधेरी – रात्री 12.31
चर्चगेट-बोरिवली-रात्री 1.00
चर्चगेट-बोरिवली- रात्री 12.41
अंधेरी -चर्चगेट-पहाटे-4.04
बोरिवली-चर्चगेट-पहाटे 3.50
बोरिवली-चर्चगेट- पहाटे 5.31