नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यात लाच घेणाऱ्या कमर्चाऱ्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच नाशिक शहर पोलिसांच्या दलातही लाच घेण्याचे प्रमाण वाढले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांमध्ये आणखी एक लाचेचे प्रकरणे समोर आले आहे. ३५ हजारांची लाच मागणाऱ्या दोन पोलिसांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रारदाराचा जमा केलेला ट्रॅक्टर सोडविण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशनमध्ये जमा असलेला ट्रॅक्टर सोडवण्यासाठी ३५ हजाराची लाच घेताना नांदगाव येथील पोलिसाला रंगेहाथ पकडण्यात आले. सुरेश सुरेश सांगळे, अभिजित उगलमुगले असे दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
नांदगाव पोलिसांनी तक्रारदाराचा ट्रॅक्टर पोलीस स्टेशनमध्ये जमा केला होता, तो सोडवण्यासाठी ३५ हजारांची लाच शेळके यांनी मागितली होती, ती स्वीकारत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार पळशीकर, प्रभाकर गवळी, वैभव देशमुख, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली, पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक नारायण न्ह्यालदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.