मुंबई (वार्ताहर) : गेल्या तीन महिन्यांत मुंबईत २,४७२ मिमी पाऊस झाला. मुंबईत सरासरी ९१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७ टक्के कमी पाऊस झाला. पावसाचा साधारण एक महिना बाकी असून त्यात बॅकलॉग भरून निघण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिलेल्या महितीनुसार मुंबईत आतापार्यंत एकूण सरासरी २,४७२ किमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी तीन महिन्यांत सरासरी २,५०२ मिमी पाऊस झाला होता. त्या वेळी पावसाचे प्रमाण ९९ टक्क्यांच्या वर होते.
यंदा १२ सप्टेंबरपर्यंत कुलाबा १,८६२.५० मिमी आणि सांताक्रूझ २,४०१.२० मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी २०२१ मध्ये १२ सप्टेंबरपर्यंत कुलाब्यात २,१७५.१; तर सांताक्रूझमध्ये २८२९.२ मिमी पावसाची नोंद झाली. यंदा सरासरी ७ टक्के कमी पाऊस झाला.
यंदा पूर्व उपनगरामध्ये अधिक पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरात सर्वाधिक २,४५८.५७ मिमी पाऊस पडला. त्याखालोखाल पश्चिम उपनगर २,२३९.६४ मिमी आणि शहरात २,१०३.९४ मिमी पावसाची नोंद झाली. शहरामध्ये ९३.९३; तर दोन्ही उपनगरांमध्ये प्रत्येकी ८६.८४ मिमी पाऊस झाला.
कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांसाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात आकाश साधारण ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. रात्री गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुढील आठवडाभर मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने पावसाचा बॅकलॉग भरून निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…