Sunday, February 15, 2026

आमदार बच्चू कडूंना न्यायालयीन कोठडी

आमदार बच्चू कडूंना न्यायालयीन कोठडी

मुंबई : आमदार बच्चू कडू यांना गिरगाव कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. याप्रकरणी बच्चू कडू यांनी जामिनासाठी गिरगाव कोर्टात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच त्यांना ताब्यात घेण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

पोलिसांनी कडू यांना ताब्यात घेतले असून, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >