Friday, July 19, 2024
Homeमहाराष्ट्रनाशकात वारकरी भवन उभारण्यास सर्वतोपरी मदत करणार : बावनकुळे

नाशकात वारकरी भवन उभारण्यास सर्वतोपरी मदत करणार : बावनकुळे

पाच कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन

नाशिक : नाशकात वारकरीभवन उभारण्यास आपण सर्वतोपरी मदत करू आणि त्यासाठी ५ कोटींचा निधीही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

नाशिक दौऱ्याच्यावेळी बावनकुळे यांनी माजी आमदार बाळासाहेब सानप साहेब यांच्या औरंगाबाद रोडवरील फार्म हाऊसला भेट दिली. यावेळी कोणार्कनगर येथील माय माऊली भजनी मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना बावनकुळे बोलत होते.

नाशकात वारकऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु त्यांच्यासाठी स्वतंत्र भवन नसल्याने त्यांची फारच कुचंबणा होते असे संस्थेचे अध्यक्ष माणिकराव देशमुख, हभप ज्ञानेश्वर जय्यतमहाल, हभप सुभाष जय्यतमहाल, हभप राजेंद्र खैरनार, नानासाहेब पवार, प्रभाकर सोनवणे, ज्ञानेश्वर निमसे यांनी निदर्शनास आणताच त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पाठवा बाकीचे मी बघून घेतो असे बावनकुळे म्हणाल्याने वारकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

यावेळी बाळासाहेब सानप, आ.देवयानी फरांदे, आ.सिमा हिरे, आ राहुल ढिकले, भाजपा प्रदेश कार्यालय प्रभारी रवी अनासपुरे, ज्येष्ठ नेते विजय साने, शहराध्यक्ष गिरिश पालवे, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव, मछिंद्र सानप, कमलेश बोडके, सौ सुनिता पिंगळे, प्रशांत जाधव, सुनील केदार, जगन पाटील, पवन भगुरकर, शामराव पिंपरकर, अमित घुगे, नाना शिलेदार, ज्ञानेश्वर पिंगळे, दिगंबर धुमाळ, चंद्रशेखर पंचाक्षरी, सुनील फडताळे, महेंद्र कराड, सुरेश निमसे, राहुल कुलकर्णी, सतनाम राजपूत, दीपक सानप, धनंजय पुजारी, उत्तम उगले, संजय संघवी मंदा फड, प्रियंका कानडे, स्मिता मुठे, चंद्रकला धुमाळ, सविता सिंग, पूनम परदेशी आदी उपस्थित

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -