Tuesday, July 1, 2025

अग्निशमन दलाला मिळणार आणखी दोन फायर रोबो

अग्निशमन दलाला मिळणार आणखी दोन फायर रोबो

मुंबई (वार्ताहर) : मुंबईतील अग्निशमन दलाला आणखी भक्कम करण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. यातच अत्याधुनिक वाहने आणण्यासोबत मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात आणखी दोन नवीन फायर रोबोंची भर पडणार आहे. या दोन रोबोंची किंमत पावणेतीन कोटी रुपये असून सप्टेंबर अखेर अग्निशमन दलाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळणार असल्याचे समजते.


शहराप्रमाणेच पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये आगीच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे अग्निशमन दलदेखील अधिक सक्षम करण्यावर पालिकेकडून भर देण्यात येत आहे. यात अत्याधुनिक वाहने आणण्यात आली असून २०१९ मध्ये पहिला फायर रोबोदेखील अग्निशमन दलात दाखल करण्यात आला. त्या वेळी त्यासाठी या रोबोवर ९८ लाख रुपयांचा खर्च झाला होता.


२०१९ रोजी रोबो दाखल झाल्यानंतर अग्निशमन दलात जादा धूर असलेल्या ठिकाणी किंवा जास्त आगेचे प्रमाण असेल या ठिकाणी जवानांना पोहोचणे शक्य नाही, पण अशा ठिकाणी या रोबोला पाठविण्यात येत असल्याने अडचणी कमी झाल्या. तीन वर्षांपासून हा रोबो अग्निशमन दलात कार्यरत आहे.

Comments
Add Comment