अब्दुल सत्तारांना फडणवीसांनी झापले

मुंबई : प्रसिद्धीसाठी परस्पर नवनव्या घोषणा करणाऱ्या मंत्र्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी दिली आहे. यावेळी मनात येईल त्या घोषणा करत सुटू नका, असे म्हणत फडणवीस यांनी शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव घेत त्यांना झापले.


शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर ४२ दिवसांनी मंत्रीपदांचा विस्तार झाला. अजून दुसरा टप्पा पार पडायचा आहे. अशातच मंत्रीपद मिळल्यानंतर काही मंत्र्यांनी प्रसिद्धीसाठी घोषणांचा सपाटाच लावला असल्याची धक्कादायक बाब समोर आली.


दरम्यान, कोणताही सारासार विचार न करता घोषणा करु नका. कोणताही निर्णय परस्पर जाहीर करु नका. मनात येईल त्या घोषणा करत सुटू नका. असे खडेबोल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांच्यासह इतर मंत्र्यांना सुनावले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही समज दिली असल्याची माहिती समोर आली आहे.


काल सोमवार मंत्रीमंडळ बैठक पार पडली. या बैठकीमध्ये केंद्राची प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना राज्यातही नवीन सन्मान योजना राबवावी किंवा केंद्रातील योजनेत राज्याचा काही वाटा समाविष्ठ करून शेतकऱ्यांना मदत योजना सुरू करण्यासंदर्भात विचारमंथन सुरू होते. दरम्यान, यासंदर्भातील माहिती प्रसारमाध्यमांमध्ये लिक झाली.


ही बाब फडणवीसांना समजली असता त्यावरुन मंत्रीमंडळ बैठकीतच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना धारेवर धरले. आणि ही माहिती फोडल्याबद्दल जाब विचारला. अजून कोणताही निर्णय झाला नसताना ही माहिती तुम्ही जाहिर कशी केली? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला असल्याची माहिती समोर आली.


त्यानंतर मी योजना जाहीर झाली नाही तर विचार सुरू आहे, असे म्हणालो असल्याचे उत्तर सत्तार यांनी फडणवीसांना दिले. मात्र, यावर फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Comments
Add Comment

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस