मुंबई (वार्ताहर) : मध्य रेल्वेने मुंबईतील महत्त्वाच्या नऊ स्थानकांवर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधा उभारल्या आहेत. या चार्जिंग सुविधामुळे वातावरणातील कार्बन उत्सर्जन कमी होईल. तसेच इलेक्ट्रिक वाहन धारकांना चार्जिंग करणे सोयीचे ठरेल.
मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, भायखळा, परळ, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, भांडुप, कल्याण आणि पनवेल येथे ईव्ही चार्जिंगची सुविधा उभारण्यात आली आहे. रेल्वेने म्हटले आहे की, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन असण्यामुळे “परवडणारे, कार्यक्षम आणि अधिक इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळेल आणि निरोगी हवा आणि स्वच्छ वातावरणास प्रोत्साहन देण्यासाठी मदत होईल”.
ही चार्जिंग सुविधा आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास उपलब्ध असेल. या सुविधांमुळे “ईव्हीसाठी पायाभूत सुविधा सुरळीतपणे चालतील. रेल्वे स्थानकांजवळील महत्त्वाच्या ठिकाणी त्यांची ईव्ही चार्ज करू शकतील.