Friday, July 4, 2025

Video : प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

मुंबई : गणेशोत्सव नुकताच संपल्यानंतर आज मंगळवारी अंगारक संकष्ट चतुर्थी आल्याने गणेशभक्तांनी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली. सोमवारी मध्यरात्रीपासूनच बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या.



गणपती बाप्पाची संकष्टी चतुर्थी दर महिन्यात येते, पण अंगारकीचा योग वर्षातून दोनदा येतो. यामुळे अंगारकी चतुर्थीला गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेता मंदिराचीही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. मंदिराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


मुंबईसह जवळच्या परिसरातील लाखो गणेशभक्तांनी बाप्पाच्या दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात रांग लावली होती

Comments
Add Comment