Monday, June 30, 2025

शिर्डीतील साई मंदिराचे विश्वस्त मंडळ बरखास्त

शिर्डीतील साई मंदिराचे विश्वस्त मंडळ बरखास्त

शिर्डी : शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव शेळके यांनी यासंदर्भातील याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. आता नवीन विश्वस्त मंडळाची नेमणूक होईपर्यंत जिल्हा न्यायाधीश साई मंदिराचा कारभार पाहणार आहेत. अवघ्या एका वर्षात या मंडळाला पायउतार व्हाव लागले आहे.


महाविकासआघाडी सरकारने नेमलेले हे विश्वस्त मंडळ बरखास्त केल्याने हा महाआघाडीसाठी मोठा धक्का आहे. साईसंस्थानच्या घटनेनुसार नेमणूक झाली नसल्याचा आक्षेप विश्वस्त मंडळावर घेण्यात आला होता.


दरम्यान गेल्या चार ते पाच महिन्यापासून औरंगाबाद खंडपीठात याबाबत सुनावणी सुरु होती. आज औरंगाबाद कोर्टाने शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर हे मंडळ बरखास्त झाल्यानंतर पुढील दोन महिन्यात नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेशही औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. शिर्डी साईबाबा मंदिर संस्थान च्या विश्वस्त मंडळावर राज्यभरातून सभासद नेमण्यात येतात. १६ लोकांना या मंडळावर निवडण्यात येते.

Comments
Add Comment