Tuesday, January 21, 2025
Homeताज्या घडामोडीमनसे विभाग अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा दाखल

मनसे विभाग अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी देण्याचे आमिष देत एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विभाग अध्यक्षाला अटक केली आहे. या प्रकरणी व्ही. पी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी हा गिरगावमध्येच वास्तव्यास आहे. आरोपीने एका ४२ वर्षीय महिलेला मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तिकिट देण्याचे आश्वासन दिले होते. पक्षाकडून उमेदवारी देण्याच्या बहाण्याने आरोपीने बलात्कार केला असल्याची तक्रार पीडित महिलेने दिली आहे. आरोपीने सप्टेंबर २०२१ ते जुलै २०२२ या दरम्यानच्या काळात बलात्कार केला असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. महिला पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३७६, ५०० आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित महिलेने काही दिवसांपूर्वी मनसे वरिष्ठांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला होता. या तक्रारीनंतर पक्षाने वृशांत वडके यांच्यावर कारवाई केली होती. चार दिवसांपूर्वीच पक्षाने राजीनामा घेतला होता.

फेब्रुवारी महिन्यात विविध उपक्रमात, तसेच वेळोवेळी राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात केलेल्या कार्याची दखल घेत मनसेच्या मलबार हिल विधानसभा विभाग अध्यक्षपदी वृशांत वडके यांची नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतील मुंबादेवी परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ही मारहाण मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली असल्याचे समोर आली. मारहाण करणारा व्यक्ती मनसेचा उपविभाग प्रमुख विनोद अरगिले होता. ही घटना समोर आल्यानंतर मनसेने अरगिलेवर कारवाई करत त्याला पक्षातून निलंबित केले. यानंतर आता मनसे पदाधिकाऱ्याने केलेल्या या कृत्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -