मुंबई : गेल्या काही दिवसांत सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. मात्र कॅबचे आणि टॅक्सीचे भाडे अजूनही वाढवण्यात आलेले नाही. सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने टॅक्सीच्या भाड्यात सुधारीत भाडेवाढ लागू करावी अशी मागणी टॅक्सी संघटनेकडुन करण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही टॅक्सी संघटनांकडून देण्यात आला आहे.
आता भाडेवाढीसाठी टॅक्सी संघटना आक्रमक झाल्या आहेत. वाढते इंधन दर पहाता टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी टॅक्सी संघटनांकडून करण्यात आली आहे. भाडेवाढ न झाल्यास येत्या १५ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा टॅक्सी संघटनांकडून देण्यात आला आहे.
टॅक्सी चालक आणि रिक्षाचालक यांनी राज्य सरकारने भाडेवाढीच्या संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. मुंबईत प्रति किलोमीटरसाठी २५ रुपये दर आहे, त्यामध्ये १० रुपयांची वाढ करावी, अशी मागणी करत टॅक्सी चालकांनी १५ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.