मुंबई (वार्ताहर) : भारताचा प्रतिभावंत फॉर्म्युला टू रेसर जेहान दारुवाला याने रविवारी इटलीमध्ये झालेली मोन्झा रेस ट्रॅक स्पर्धा जिंकली आहे. या मुंबईकर रेसरचे हे चौथे फॉर्म्युला टू जेतेपद आहे.
मोन्झा रेस ट्रॅक स्पर्धेत २३ वर्षीय जेहान याने सहाव्या ग्रीडवरून सुरुवात केली. मात्र, त्याने कमालीचे सातत्य दाखवले. प्रतिस्पर्ध्यांसह अडथळेही सहज पार करताना त्याने पोडियम फिनिश केली.
मोन्झा रेस ट्रॅकच्या माध्यमातून यंदाच्या हंगामातील पहिली स्पर्धा जिंकण्यात जेहान याला यश आले. शनिवारच्या स्प्रिंट रेटमध्ये तो पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावरून पोहोचला होता. वीकेंडच्या दोन रेसमध्ये पोडियम फिनिश करण्याची जेहान याची यंदाच्या वर्षातील ही आठवी वेळ आहे.