मुंबई : राज्यात आगामी ५ दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, अरबी समुद्रातील चक्राकार वारे या पोषक वातावरणामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. १२) दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दक्षिण महाराष्ट्राच्या पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा आहे. पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात विजांसह पावसाचा इशारा आहे.
या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
कोकण : मुंबई, ठाणे
विदर्भ : वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
विजांसह पावसाचा इशारा
कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रागयड
मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर
मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड
विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ