मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक या वर्षाच्या अखेरीस होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे. भाजपने त्यांच्याकडे गुजरात निवडणुकीत दहा विधानसभा जागेची जबाबदारी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
जर गुजरात निवडणुकीची जबाबदारी शेलार यांना दिली असेल तर मुंबई महापालिका निवडणूक कोणाच्या नेतृत्वात लढवणार असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. गुजरातमध्ये साधारण डिसेंबर महिन्यात निवडणुका पार पडणार आहेत. यातच गुजरातमधील सुरत येथील १० विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी शेलार आणि त्यांच्या टीमला देण्यात आली आहे.
मागील गुजरात निवडणुकीत आशिष शेलार आणि त्यांच्या टीमने सूरतमध्ये चांगली कामगिरी केली केली होती. त्यामुळे यंदाही शेलार आणि त्यांच्या टीमवर्कवर केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवला आहे.