न्यूयॉर्क : अमेरिकेत कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता न्यूयॉर्कमध्ये पोलियोचे रुग्ण वाढल्याने शहरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी होचुल यांनी न्यूयॉर्कमध्ये पोलियो व्हॅक्सिनेशन वाढवण्याचे आदेश दिले असून शहरात आपत्कालिन स्थिती घोषित करण्यात आली आहे. सोबतच अधिकाऱ्यांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे.
आरोग्य विभागाकडून पोलियो व्हायरस फार घातक असल्याचे सांगितले जात आहे. तूर्तास निष्काळजीपणामुळे येत्या दिवसांत या रोगाने लोकांचा मृत्यू होण्याचाही धोका असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. पोलियो व्हायरल हा लहान मुलांसाठी सगळ्यात घातक असून या व्हायरसवर केवळ व्हॅक्सिनच्या मदतीनेच नियंत्रण ठेवता येऊ शकते.
या व्हायरचा आतापर्यंत एकच रूग्ण सापडला असून ९ वर्षांत मिळालेला हा पहिलाच रूग्ण होता. त्यामुळे शहरात लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अलर्ट जारी करून पूल आणि उपहारगृहे बंद ठेवण्यात आले आहेत. माहितीप्रमाणे ९ ऑक्टोबरला अपात्कालिन परिस्थिती (इमर्जंसी) हटवण्यात येईल. या कालावधीदरम्यान संपूर्ण ठिकाणी पोलियो व्हॅक्सिनचे डोज सर्वांना देण्याचं धोरण राबवण्यात येईल.
पोलियो व्हॅक्सिन सुरू होण्याआधी १९५२ मध्ये अमेरिकेमध्ये पोलियोचे ५८००० रूग्ण मिळाले होते. तर ३१४५ रूग्णांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक मुले अपंग झाले होते. त्यानंतर अमेरिकेत पोलियोविरोधात व्हॅक्सिनेशन मोहिम सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पोलियोच्या रूग्णांमध्ये घट झाली होती.