मुंबई : मुंबईतल्या गोवंडी भागातल्या शासकीय हॉस्टेलमधून ६ मुली ११ सप्टेंबरला पहाटे पाचच्या सुमारास पळून गेल्या. टॉयलेटचे ग्रील आणि खिडकी तोडून या मुली पळून गेल्याने खळबळ माजली आहे.
पोलिसांनी या मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या सहा मुली अल्पवयीन आहेत. या मुलींना पळून जाण्यास कोणी मदत केली, त्या कशा पळून गेल्या, या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का, या सगळ्याचा पोलीस शोध घेत आहेत.
गोवंडीच्या या हॉस्टेलमध्ये मानवी तस्करी, भिकारी, बेकायदेशीर कामे, अशा काही ठिकाणी सापडलेल्या मुलींना सोडवून येथे ठेवले जाते. त्यामुळे या मुलींच्या पळून जाण्यामागे काय उद्देश आहे, याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.