पाकिस्तानात पूरस्थितीत मंदिरात मुस्लिमांना आश्रय

  77

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) : पाकिस्तानात निर्माण झालेल्या पूरस्थितीमध्ये मानवतेचे दर्शन अनुभवास मिळाले आहे. येथील मंदिरामध्ये ३०० मुस्लिमांना आश्रय दिल्याच्या घटनेमुळे मानवतेचा एक अनुभव आला आहे. पाकिस्तानला पूरस्थितीचा जबर फटका बसला आहे. नारी, बोलन व लहरी नद्यांना पूर आल्यामुळे गावाचा इतर प्रांताशी असलेला संपर्क तुटला आहे. यामुळे दुर्गम भागातील नागरिकानी स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे घर सोडले आहे. या पुराचा १०० खोल्यांच्या बाबा माधोदास मंदिराला कोणताही फटका बसला नाही. या मंदिरात सर्वच पूरग्रस्त व मुक्या प्राण्यांना आसरा दिला आहे.


स्थानिक नागरिक मदतीसाठी दारोदार भटकत आहेत. ही स्थिती पाहता बलूचिस्तान प्रांतातील कच्छी जिल्ह्यातील छोट्याशा जलाल खान गावातील एका मंदिराने सर्व पूरग्रस्तांसाठी आपले दरवाजे उघडले आहेत. यासंबंधीच्या वृत्तानुसार, मंदिराने जवळपास २०० ते ३०० पूरग्रस्तांना अन्न-पाणी व निवारा दिला आहे. यात बहुतांश मुस्लीम पूरग्रस्तांचा समावेश आहे.


स्थानिकांच्या माहितीनुसार, बाबा माधोदास एक हिंदू संत होते. त्यांच्यावर या भागातील हिंदू-मुस्लिमांची अपार श्रद्धा होती. भाग नारी तहसीलमधून या गावात येणारे इल्तफ बुजदार सांगतात की, ते उंटावरून प्रवास करत होते. त्यांच्यासाठी धर्मापेक्षा मानवता सर्वात महत्वाची होती.


जलाल खानमधील हिंदू समुदायाचे बहुतांश सदस्य रोजगार व अन्य संधींसाठी कच्छीच्या अन्य शहरांत धाव घेतात. काही कुटुंब या मंदिराच्या देखभालीसाठी येथेच राहतात. भाग नारी तहसीलचे एक ५५ वर्षीय दुकानदार रतन कुमार सध्या या मंदिराचे प्रभारी आहेत. इसरार मुघेरी नामक डॉक्टरचे येथे वैद्यकीय शिबिर सुरू आहे. येथील हिंदू बांधवांनी मुस्लिमांना मंदिरात येऊन आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

शक्तिशाली भूकंपाने अफगाणिस्तान हादरले! अनेकांचा मृत्यू... दिल्ली-एनसीआरपर्यंत जाणवले धक्के

कराची: रविवारी ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री पाकिस्तान सीमेजवळ पूर्व अफगाणिस्तानच्या आग्नेय भागात तीव्र भूकंपाचे

मोदी-जिनपिंग-पुतिन... SEO शिखर परिषदेत त्रिकूटांचे जमले! हस्तांदोलन करत मैत्रीपूर्ण पद्धतीने झाली चर्चा

शांघाय: रविवारपासून चीनमधील तियानजिन येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (SEO) शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे.

२०२६ मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर येणार

पंतप्रधान मोदींनी पुढील वर्षी भारतात होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित

पंतप्रधान आणि चीनचे अध्यक्ष यांच्या चर्चेत काय ठरले ?

तिआनजिन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची शांघाय कॉऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशनच्या शिखर

युक्रेनच्या माजी संसद सभापतींची गोळ्या घालून हत्या

ल्विव्ह: पश्चिम युक्रेनमध्ये एका प्रमुख युक्रेनियन राजकारणी आणि माजी संसद सभापतींची अज्ञात हल्लेखोरांकडून

मोठी बातमी! इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये हुथी पंतप्रधान अहमद अल-राहवी यांचा मृत्यू

येमेनमधील सना येथे इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात हुथी पंतप्रधानासह अनेक प्रमुख नेत्यांचा मृत्यू  सना: