नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एलिझाबेथ यांच्या निधनानंतर गूगलने राखाडी रंगाचा लोगो करून इंग्लंडच्या दिवंगत महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली वाहिली आहे. गूगलचे मुख्य कार्यकारी सुंदर पिचाई यांनी सांगितले की, अनेक वृत्तपत्रांनी राणीचे वर्णन “एकत्रित शक्ती” म्हणून केले आहे.
भारतानेही दु:ख व्यक्त केले आहे. भारताने आज एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल एक दिवसाचा दुखवटा पाळण्याचे आदेश दिले आहेत. भारताच्या गृह मंत्रालयाने हा आदेश जारी केला आहे.
ज्यांनी अनेक दशके होणाऱ्या बदलांमध्ये एक स्थिर व स्थान मिळवले होते. गुगलने राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या महान कारकिर्दीसाठी गुगलने त्यांच्या लोगोचा रंग राखाडी केला आहे. यापूर्वी ही माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू यांच्या निधनानंतर, २०१८ मध्ये बुशच्या अंत्यसंस्काराच्या वेळी, लोगो राखाडी ठेवण्यात आला होता. गुगल देशातील बदलत्या घडामोडींनुसार लोगोमध्ये बदल करत असते.