१० दिवसात नव्या पक्षाची घोषणा : गुलाम नबी आझाद

  82

श्रीनगर (वृत्तसंस्था) : काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले ज्येष्ठ नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या १० दिवसांत नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचे त्यांनी जम्मू-काश्मीरमधील एका जाहीर सभेत सांगितले. ७३ वर्षीय आझाद यांनी रविवारी बारामुल्ला येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, माझ्यावर भाजपचा असल्याचा आरोप होतो, पण मी फक्त पैगंबराचा गुलाम आहे.


ते पुढे म्हणाले, मी विरोधी पक्षनेता होतो, मी ४ तास मैदानावर बसून आंदोलन केले. मी कधीच धर्माच्या नावावर रक्तपात आणि मतदान होऊ देणार नाही. कलम ३७० वरील माझे भाषण किमान २०० देशांनी ऐकले आहे. मी ३७० वर का बोलत नाही असा आरोप माझ्यावर करण्यात आला. मी इथे मतांसाठी लोकांना मूर्ख बनवण्यासाठी आलो नाही. गेल्या १० वर्षांपासून काँग्रेसला ५० पेक्षा जास्त जागा मिळाल्या नाहीत. यापुढेही काँग्रेसला फार काही मिळणार नाही.


मला जम्मू-काश्मीरच्या लोकांना सांगायचे आहे की, तुम्ही मला साथ द्या, मी नेहमी तुमच्यासोबत उभा राहीन. मी नसतो तर संसदेत काश्मीरचा आवाज कोणीही उठवला नसता. १९९० च्या शोकांतिकेने काश्मिरी पंडित, मुस्लिम आणि शीखांसह अनेकांचे प्राण गेले. अनेक काश्मिरी पंडितांना पळून जावे लागले. काश्मीरचे मोठे नुकसान झाले, पण आता राज्याला सुधारण्याची वेळ आली आहे,' असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

Cloudburst Updates : एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर, भूस्खलन अन् ३० जण... हिमाचल प्रदेशात हाहाकार

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशात नैसर्गिक संकटाने तेथील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. अनेक रस्ते भूस्खलनाने बंद

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे