
अॅड. रिया करंजकर
अग्निशमन दलाच्या इथे फोन खणखणू लागला आणि जालनामधील अयोध्या नगरीमध्ये सिलिंडर स्फोट झालेला आहे, असं त्यांना कळवण्यात आलं. अग्निशमन दल आपल्या ताफ्यासह जलद गतीने अयोध्या नगरीच्या दिशेने निघाले. जवानांना जाईपर्यंत उशीरच झाला कारण तोपर्यंत एक व्यक्ती जळून खाक झालेली होती. एवढा जळला होता की त्याची राख शिल्लक राहिली होती.
जालना येथे प्रॅक्टिस करणारे सुमेध हे आपल्या पत्नीसोबत अयोध्या नगरीमध्ये राहण्यास होते. त्यांची प्रॅक्टिस व्यवस्थित चालू होती, पण अचानक त्यांना अपघाताला समोर जाऊ लागलं होतं. शेजाऱ्या-पाजाऱ्यांना नेमकं काय झालं, हे कळेना. जेव्हा त्यांची पत्नी आरडा ओरडा करू लागली, त्या वेळी लोकांना कळालं की, त्यांच्या घरामध्ये सिलिंडरचा स्फोट झालेला आहे, पण सुमेध यांच्या वकील मित्राने वकील संघटनांनी हा अपघात नसून घातपात असावा असा संशय व्यक्त केला. कारण, दोन दिवस अगोदरपासून सुमित कोणाचे फोन रिसीव्ह करत नव्हता व कोणाला फोनही करत नव्हता. दोन दिवस अगोदर मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त केला. कारण, त्याचं कोणाशी कॉन्टॅक्ट झालेलं नव्हतं व तो कोर्टातही दिसला नव्हता आणि अचानक त्याचा अपघात झाला यावर वकील संघटनेचा विश्वास बसत नव्हता म्हणून त्यांनी पोलीस चौकशी व्हावी, असं पत्र कमिशनरला लिहिलं आणि मीरच्या नातेवाइकांनीही सुमितची पत्नी सारिका हिच्यावर संशय व्यक्त केला. त्याच्यामुळे पोलिसांना सारिकाला ताब्यात घ्यावं लागलं आणि संशयित म्हणून तिच्या दोन साथीदारांनाही त्यांनी ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली. या घटनेचा तपास केल्यावर पोलिसांना असे प्रश्न पडले की, सुमेध आणि सारिका यांचे फोन चोराने चोरले कसे? घरामधले दोन्ही सिलिंडर जमिनीवर पडलेल्या अवस्थेत होते. दोन्ही सिलिंडर एकदम कसे पडले? सिलिंडर लिकेज झाला तर त्याचा एवढा आगीचा भडका कसा झाला? आणि सिलिंडरच्या बाजूला वकील सुमेध यांचा मृतदेहाची राख होती. जर सुमेध यांना आग लागली, तर ते तिथून पळाले का नाहीत. ते बाहेरच्या दिशेने का नाही निघाले? हा एक मोठा प्रश्न पोलिसांना पडला. एवढा मोठा जर स्पोर्ट झाला असेल, तर त्यांच्या पत्नीला काहीच दुखापत कशी काय नाही झाली व सुमेध यांची बाईक ते राहत असलेल्या वसाहतीपासून दुसऱ्या वसाहतीमध्ये कशी? हे प्रश्न तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना पडलेत आणि सुमेध आणि त्यांच्या पत्नीचा दोघांचे फोन एकदमच चोरीला कसा गेला आणि चोराने कसा चोरला? या सर्व घटना एकदम कशा घडल्या त्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का?
पोलीस अधिकाऱ्यांनी पत्नी सारिका व साथीदारांवर ३०२ कलम लागू करून चौकशीसाठी ताब्यात घेतलं, असा संशय व्यक्त केला जाऊ लागला की, वकील सुमेध यांना दोन दिवस अगोदरच मारण्यात आलं असावं व आजूबाजूवाल्यांना दुर्गंधी जाऊ नये म्हणून तो स्फोट घडून आणला असावा कारण सुमेध यांच्या देहाची राख ही बरोबर सिलिंडरच्या बाजूलाच होती म्हणजे हा सगळा प्लॅन त्यांच्या पत्नीने घडून आणला असावा असं तपास अधिकाऱ्यांसमोर आलं.
सुमेध यांचा रिपोर्ट अजून यायचा बाकी आहे. कारण ही घटना जालनामध्ये ३१ ऑगस्ट रोजी झालेली आहे. रिपोर्टनुसार नक्कीच वकील सुमेध यांचा अपघात की, घातपात हे समोर येईल. बनाव करणाऱ्या पत्नीला न्यायालय योग्य शिक्षा देईल. गुन्हेगार किती सराईत असला तरी काहीतरी पुरावा मागे ठेवतो हे मात्र नक्की!
(सत्य घटनेवर आधारित; नावं बदललेली आहेत.)