Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

प्रसिद्ध अल्पवयीन यूट्युबर गायब, मदतीचे आवाहन

प्रसिद्ध अल्पवयीन यूट्युबर गायब, मदतीचे आवाहन

औरंगाबाद : औरंगाबाद येथील एक प्रसिद्ध अल्पवयीन यूट्युबर काल दुपारपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे. तर पोलिसांकडून मुलीचा शोध घेतला आहे. विशेष म्हणजे ही अल्पवयीन मुलगी यूट्युबर प्रसिद्ध असून, तिचे यूट्युबवर ४.३२ मिलियन सबस्क्रायबर आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील एक प्रसिद्ध अल्पवयीन यूट्युबर बिंदास काव्या ही कालपासून गायब आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिचा अनेक ठिकाणी शोध घेतला. मात्र ती आढळून आली नाही. त्यामुळे अखेर छावणी पोलिसात याप्रकरणी मुलगी हरवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांकडून आता मुलीचा शोध सुरु आहे.



याबाबत या मुलीच्या आईने एक १९ मिनिटाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, ज्यात आमची मुलगी कधीही एकटी राहत नाही. एवढ्या वेळ ती एकटी राहू शकत नाही. त्यामुळे तिला कुठेही पाहिले तर आम्हाला माहिती कळवा, असे आवाहन केले आहे. तसेच आम्हाला कुणीही मदत करत नसल्याचा आरोपही मुलीच्या आईने केला आहे.


https://youtu.be/-QViaKmSOgo

https://www.youtube.com/channel/UCUgvCC6iygghq-f2r96P-Jw
Comments
Add Comment