Friday, March 28, 2025
Homeमहत्वाची बातमीचार्ल्स, ब्रिटनचे नवे सम्राट

चार्ल्स, ब्रिटनचे नवे सम्राट

लंडन (वृत्तसंस्था) : चार्ल्स तिसरे यांना सेंट जेम्स पॅलेसमध्ये एका ऐतिहासिक कार्यक्रमात अधिकृतरित्या ब्रिटनचे सम्राट जाहीर करण्यात आले आहे. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा सर्वात मोठा मुलगा, ७३ वर्षीय चार्ल्स हे ब्रिटनचे राजे बनले आहेत. ब्रिटनमधील परंपरेनुसार राणीच्या निधनानंतर २४ तासांत राज्याभिषेक करण्यासाठी एक परिषद बोलावली जाते. महाराणीच्या निधनाची घोषणा उशिरा झाल्याने चार्ल्स तिसरे यांच्या राज्याभिषेक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले नव्हते. दरम्यान, भारतात ११ सप्टेंबर रोजी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानिमित्त एक दिवसाचा दुखवटा पाळला जाणार आहे.

चार्ल्स तिसरे यांनी संपूर्ण देशाला संबोधित करत असताना एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली वाहिली. यावेळी चार्ल्स यांनी एलिझाबेथ यांच्या आठवणी जागवल्या. एलिझाबेथ द्वितीय यांनी ज्या प्रकारे सार्वभौम अबाधित ठेवत सेवा केली त्याप्रमाणे कारभार करु, असे चार्ल्स म्हणाले. चार्ल्स तिसरे यांनी राज्याभिषेकानंतर विल्यम यांना ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ ही उपाधी दिली. तर, केट यांना ‘प्रिन्सेस ऑफ वेल्स’ ही उपाधी देण्यात आली आहे.

राजा चार्ल्स तिसरे यांनी राज्याभिषेक कार्यक्रमात संबोधित केले. प्रिव्ही कौन्सिलला संबोधित करताना एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाची, ब्रिटनची आणि जगाची कधीही न भरुन निघणारी हानी झाल्याचे चार्ल्स तिसरे म्हणाले. एलिझाबेथ द्वितीय यांनी जीवनभर प्रेम आणि निस्वार्थ सेवेचे उदाहरण दाखवून दिले. आईच्या शासन काळात समर्पण आणि निष्ठेचा अंतर्भाव होता, असे चार्ल्स तिसरे म्हणाले. याशिवाय पत्नीकडून सातत्याने मिळणाऱ्या समर्थनामुळे प्रोत्साहित असल्याचे ते म्हणाले.

प्रिन्स चार्ल्स, पेनी मॉरडंट आणि पंतप्रधान लिझ ट्रस यांनी जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. चार्ल्स तिसरे यांचा राज्याभिषेक सोहळा सेंट जेम्स पॅलेस लंडन येथे आयोजित करण्यात करण्यात आला होता. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी निधन झाले. बकिंगहॅम पॅलेसने त्यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा केली होती. तब्बल ७० वर्षे राज्य केल्यानंतर, ब्रिटनमधील सर्वात जास्त काळ महाराणी राहिलेल्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी बालमोरल येथे निधन झाले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -