नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक कुस्ती स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. टोकियो ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया आणि रवी कुमार दहिया हे सर्बियाच्या बेलग्रेड येथे होणा-या २०२२ जागतिक कुस्ती स्पर्धेत ३० सदस्यीय भारतीय कुस्ती दलाचे नेतृत्व करतील. दरम्यान, १८ सप्टेंबरपर्यंत बेलग्रेड येथे रंगणाऱ्या ग्रीको-रोमन कुस्ती तसेच पुरुष आणि महिलांच्या फ्री स्टाईल स्पर्धांचा समावेश आहे. तीन गटांमध्ये भारताने प्रत्येकी १० कुस्तीपटू पाठवले आहेत. नुकतीच पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी दमदार प्रदर्शन केले होते. जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू कशी कामगिरी बजावतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बर्मिंगहॅम येथे गेल्या महिन्यात पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत बजरंग पुनिया आणि रवि कुमार दहियाने सुवर्णपदक जिंकले होते. आता जागतिक कुस्ती स्पर्धेत दम दाखवण्यासाठी दोन्ही खेळाडू सज्ज झाले आहेत. त्यांना नॅशनल सेलेक्शन ट्रायलमधून सुट देण्यात आली आहे.
टोकियो २०२० मध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या रवि कुमार दहियाने २०१९ मध्ये जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्याने पुरूषांच्या ५७ किलोग्राम वजनी गटात दुसरे मानांकन मिळाले असून त्याला अमेरिकेच्या विद्यमान विश्वविजेत्या थॉमस गिलमन याच्याशी कडवी टक्कर द्यावी लागेल. बजरंग पुनियालाही ६५ किलोग्राम वजनी गटात दुसरे मानांकन मिळाले आहे. त्यांने २०१८ मध्ये रौप्य, २०१३ आणि २०१९ मध्ये कांस्य पदक जिंकले होते. बजरंग पुनिया हा जागतिक चॅम्पियनशिपमधील सर्वात यशस्वी भारतीय कुस्तीपटू आहे, त्याच्या नावावर तीन पदकांची नोंद आहे.
भारतीय संघ
पुरूष फ्रीस्टाइल
रवि दहिया (५७ किलोग्राम), पंकज मलिक (६१ किलो), बजरंग पुनिया (६५ किलोग्राम), नवीन मलिक (७० किलोग्राम), सागर जगलान (७४ किलोग्राम), दीपक मिर्का (७९ किलोग्राम), दीपक पूनिया (८६ किलोग्राम), विक्की हुड्डा (९२ किलोग्राम), विक्की चाहर (९७ किलोग्राम), दिनेश धनखड़ (१२५ किलोग्राम)
महिला फ्रीस्टाइल
अंकुश (५० किलोग्राम), विनेश फोगट (५३ किलोग्राम), सुषमा शौकीन (५५ किलोग्राम), सरिता मोर (५७ किलोग्राम), मानसी अहलावत (५९ किलोग्राम), सोनम मलिक (६२ किलोग्राम), शेफाली (६५ किलोग्राम), निशा दहिया (६८ किलोग्राम), रीतिका (७२ किलोग्राम) और प्रियंका (७६ किलोग्राम)
ग्रीको रोमन
अर्जुन हलकुर्की (५५ किलोग्राम), ज्ञानेंद्र (६० किलोग्राम), नीरज (६३ किलोग्राम), आशु (६७ किलोग्राम), विकास (७२ किलोग्राम), सचिन (७७ किलोग्राम), हरप्रीत सिंह (८२ किलोग्राम), सुनील कुमार (८७ किलोग्राम), दीपांशु (९७ किलोग्राम), सतीश (१३० किलोग्राम)