Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीआजही मुसळधार पावसाने झोडपले

आजही मुसळधार पावसाने झोडपले

मुंबई : विजांच्या कडकडाटासह पुन्हा एकदा मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. ऐन गणेशोत्सव काळामध्ये झालेल्या पावसामुळे नागरिकांची प्रचंड दैना उडाली आहे. सखल भागातील रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक मंदावली. लोकल सेवाही विस्कळीत झाल्याने कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवरील उपनगरीय वाहतुकीवर परिणाम झाला असून लोकल ट्रेन १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

पूर्व उपनगर परिसरात पडत असलेल्या पावसाचा फटका हा सकल भागात राहणाऱ्या नागरिकांना बसला आहे. सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. काही नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरले. भांडुपमधील कोकण नगर, सह्याद्री नगर, बुद्ध नगर, पठाण तबेला या परिसरात जलमय स्थिती झाली. या परिसरातील रखडलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पामुळे परिसरात नाला रुंदीकरण झाले नाही. त्यामुळे पावसाचे संपूर्ण पाणी रस्त्यावर तसेच थेट घरांमध्ये शिरले आहे.

तर सलग दुसऱ्या दिवशीही ठाण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा हा जोर असाच कायम राहिल्यास सखल भागांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता आहे. उद्या अनंत चतुर्दशी असून सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे विसर्जन केले जाणार आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास गणेश मंडळांच्या विसर्जनाच्या तयारीत अडथळे येण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -