Sunday, July 21, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणमुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; १४ जण जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; १४ जण जखमी

पेण : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूर फाटा ब्रीजवर पहाटे २ वाजता टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरमधील एकूण २२ प्रवाशांपैकी १४ प्रवासी जखमी झाले आहेत. कोकणातून मुंबईचा परतीचा प्रवास करताना हा अपघात झाला.

टेम्पो ट्रॅव्हलर (एमएच ४३ बीपी ०७५६) खेडवरून मुंबई सांताक्रूझकडे जात होती. त्यावेळी पेण हमरापूर ब्रीजवरील बंद पडलेल्या कॉईल ट्रेलरला (एमएच ४६ एआर ००७४) मागून धडक दिल्याने अपघात घडला. सर्व अपघातग्रस्तांना तत्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -