मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यकारभार हाती घेतल्यापासून आता जवळपास दोन महिने झाले आहेत. मात्र या दोनच महिन्यात मुख्यमंत्री रात्री उशीरीपर्यंत बैठका आणि कामकाज करत असल्याने एकनाथ शिंदेंवर अधिकारी वर्ग नाराज असल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे हे प्रोटोकॉल पाळत नसल्याने अधिकारी वर्ग त्रस्त आहे. मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्यात अनेकदा परस्पर फेरफार केली जाते. या बदलाची माहिती पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांनाही नसते. त्यामुळे सुरक्षेसाठी असलेल्या आणि तैनात असलेल्या पोलिसांनाही ताटकळत उभे राहावे लागते. दिलेल्या वेळेत मुख्यमंत्री शिंदे पोहोचत नाहीत. रात्री उशिरा बैठका, दौरे घेतात. त्यामुळे तो सगळा वेळ अधिकाऱ्यांना काम करत बसावे लागते. यामुळे अधिकारी वैतागले आहेत.