मुंबई : राज्याच्या विविध भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. थोडीफार उघडीप घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा जोरदार बरसणार आहे. अशात आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा सक्रीय होणार आहे. यामुळे शेतीच्या कामांना वेग आला असून आता अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईसह ठाणे परिसारत चांगली पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर लातूर, बीड, नाशिक, परभणीसह हिंगोली जिल्ह्यातही पाऊस पडला आहे.
लांबलेल्या पावसामुळे खरीप पिके धोक्यात आली होती, मात्र, पावसामुळे पिकांनी जीवदान मिळाले आहे. दरम्यान, आजही पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.