Saturday, October 25, 2025
Happy Diwali

नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीला आता भारतातही मंजुरी

नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीला आता भारतातही मंजुरी

नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीकरण सध्या देशात वेगाने सुरू आहे. कोरोना विरोधातील लढाईत मोठे यश मिळाले असून नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला मंजुरी देण्यात आली आहे.

भारत बायोटेकला डीसीजीआय कडून नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड १९ लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी मिळाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी दिली आहे. नाकावाटे दिली जाणारी ही भारतातली पहिली कोरोना प्रतिबंधक लस असेल.

इतर लसी दंडात दिल्या जातात. यामध्ये औषध स्नायूंमध्ये जाणे गरजेचे असते. मात्र ही नवी लस स्नायूत देण्याची गरज नाही. नाकामध्ये दोन ते तीन थेंब टाकून ही लस देण्यात येते. नाक चोंदल्यास आपण जो स्प्रे वापरतो, त्याप्रमाणेच ही लस देता येणार आहे. भारत बायोटेकने घेतलेल्या चाचण्यांमध्ये या लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स आढळून आले नाहीत.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मंडविया यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. कोरोनाविरोधात भारताच्या लढाईला मोठे बळ मिळाले असल्याचे ट्वीट त्यांनी केले.

https://twitter.com/mansukhmandviya/status/1567080427575459840
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा