नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक मध्ये यावर्षी अनंत चतुर्दशी ची मिरवणूक ही सकाळी अकरा वाजता सुरू करण्याचा निर्णय पोलीस प्रशासन आणि गणेश उत्सव महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. नाशिकच्या इतिहासात प्रथमच सकाळी मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये गणेश उत्सव महामंडळ आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रशासनाच्या वतीने पोलीस उपयुक्त अमोल तांबे, पोलीस आयुक्त दिपाली खन्ना व इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते तर गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने अध्यक्ष समीर शेटे, गजानन शेलार, माजी महापौर विनायक पांडे, सुनील बागुल, राजेंद्र बागुल व इतर २१ मंडळाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
या बैठकीमध्ये सर्वानुमते गणेश उत्सवा निमित्त आनंद चतुर्दशीच्या दिवशी शहरातील निघणाऱ्या मिरवणुकीची सुरुवात दुपारी चार वाजता न करता सकाळी ११ वाजता करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये आत्तापर्यंत म्हणजे यावर्षी पर्यंत दुपारी चार वाजता आनंद चतुर्दशीच्या मिरवणुकीला सुरुवात होती परंतु आता यावर्षी प्रथमच मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. याच बरोबरीला विद्युत रोषणाई असणारे सर्व मंडळ ही पाठीमागे असणार आहे. असे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले याच बरोबरीने वेळेचे पालन म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत ही मिरवणूक संपली नाही तर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
नाशिकच्या गणेशोत्सवात पोलिसांची सकारात्मक भूमिका असून विसर्जन मिरवणुकीत सार्वजनिक मंडळानी प्रबोधनात्मक विषयावरील देखावे सादरीकरणासह शांतता उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप द्यावा. तसेच विसर्जन हे रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण करावे असा निर्णय गणेश विसर्जन मिरवणूक नियोजन बैठकीत घेण्यात आला आहे, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याशिवाय पोलीस प्रशासनातील अधिकारी व गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसंदर्भात चर्चा झाली. यात शहरातील वाकडी बारव येथून मिरवणुकांना सुरुवात होऊन गंगेवर समारोप होईल. दरम्यान आजच नाशिक पोलिसांच्या माध्यमातून मिरवणूक मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
प्रथमच सकाळी अकरा वाजता मिरवणुकीला सुरवात होणार असल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साह आहे. यामध्ये मानाच्या गणपतीचे क्रमांक तसेच मिरवणूक मार्ग बदलण्याची काही मंडळांनी मागणी केली मात्र काही जणांनी या मागणीला विरोध केला. तसेच चिठ्ठी पद्धतीने गणेश मंडळांना क्रमांक द्या अशीही प्रमुख मंडळ पदाधिकाऱ्यांची मागणी केली.
उशीर केल्यास होणार गुन्हे दाखल
सकाळी ११ वाजता मिरवणूक सुरु होणार असून रात्री १२ वाजेपर्यंत चालणार मिरवणूक चालणार आहे. गेल्या वर्षी १ वाजता मिरवणूक निघाली होती. मात्र यंदा प्रथमच सकाळी मिरवणूक निघणार आहे. पारंपरिक पद्धतीने वाद्य आणि ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक निघणार असून मिरवणुकीला उशीर केल्यास गुन्हे दाखल होणार आहेत. तर लाईट असलेले मंडळ शेवटी राहणार असून स्वागत करण्यासाठी मंडळ पदाधिकाऱ्यांनी स्टेजवर जाणे टाळावे, पोलिसांच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा विसर्जन मिरवणुकीत २१ गणेश मंडळ सहभागी होणार आहेत.
यंदा मिरवणूक सकाळी सुरु होणार
दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून परंपरा असलेल्या गणेश विसर्ज मिरवणुकीत बदल करण्यात आला आहे. दरवर्षी एक वाजता सुरु होणारी मिरवणूक यंदा अकरा वाजता सुरु होणार आहे. गणेश विसर्जन मिरवणूक दुपारी एक ऐवजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. महत्वाचे म्हणजे गणेश विसर्जन मिरवणूक यंदा कठोर नियम लावण्यात आले असून ज्या मंडळाची मिरवणूक रेंगाळेल, त्या पदाधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आली आहे.