Monday, February 17, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेट्रॅकमनच्या सतर्कतेने कल्याणजवळ एक्स्प्रेसचा अपघात टळला

ट्रॅकमनच्या सतर्कतेने कल्याणजवळ एक्स्प्रेसचा अपघात टळला

कल्याण : कर्तव्यदक्ष ट्रॅकमनमुळे कल्याण येथे रेल्वेचा अपघात टळला. हा अपघात टळला. कल्याण जलद डाऊन मार्गावरील रेल्वे रुळाला तडा गेल्याचे लक्षात आल्यानंतर या मार्गावरील लोकल वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली. रेल्वे रुळाला तडा गेल्याने सकाळच्या वेळेस मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना समोर आली तेव्हा इंद्रायणी एक्स्प्रेस वेगाने येत होती. त्याचवेळी कर्तव्यावर असलेले ट्रॅकमन हिरा लाल आणि मिथुन कुमार यांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेतले. त्याच वेळी मिथुन कुमारने ताबडतोब लाल सिग्नल दाखवत एक्स्प्रेसला थांबवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तर, हिरा लाल हे तडा गेलेल्या रुळाजवळ उभे होते. ट्रॅकमनच्या सतर्कतेमुळे मोठा रेल्वे अपघात टळला. या मार्गावरील वाहतूक इतर मार्गावरून वळवण्यात आली होती. सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास रेल्वे रुळ दुरुस्त करण्यात आला. मात्र, या बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.

दरम्यान, रेल्वे रुळाला तडा गेल्याचा परिणाम मुंबई लोकलवरही झाला होता. मुंबईच्या दिशेने जाणारी जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतले. रेल्वे रुळ तातडीने दुरुस्त करत या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होती

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -